অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सामान्य समस्या

सामान्य समस्या

  • अल्सर
  • अल्सर म्हणजे काय, अल्सर कशाने होतो , अल्सरची लक्षणे व उपाय ह्याबद्दल उपयुक्त माहिती यामध्ये दिली आहेत.

  • अ‍ॅलर्जी
  • प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश व्यक्तींमध्ये आढळणारी एक समस्या म्हणजे अ‍ॅलर्जी

  • ऊष्माघात
  • उष्माघात म्हणजेच सुर्यघात. ही जीवघेणी अवस्था आहे ज्यात प्रखर तापमानाला सामोरे गेल्याने शारिरातील ऊष्णता- संतूलन संस्था नाकाम होते.

  • केस गळणे
  • केस गळण्याच्या समस्यामधे केस विरळ होणे ते पूर्ण टक्कल पडणे यांचा समावेश असतो. केस अनेक कारणांमुळ गळू शकतात.

  • डीहायड्रेशन
  • शरीरातून अतिप्रमाणात पाण्याचा –हास होणे म्हणजे डीहायड्रेशन होय. अतिसार सारख्या आजारामुळे डीहायड्रेशन होऊ शकते.

  • डोकेदुखी
  • बहुतेक सर्वांनाच कधीतरी डोकेदुखी होत असते, आणि काही जणांना तर ती फारच त्रासदायक ठरते. बहुतेक ही थोड्या वेळासाठीच होते आणि आपोआपच बरी होवून जाते.

  • तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम
  • तंबाखूच्‍या सेवनामुळे तोंडाचा, घशाचा, फुफ्फुसाचा, पोटाचा, किडनीचा, किंवा मूत्राशयाचा इत्यादि कँसर (कर्करोग) होऊ शकतात.

  • ताप
  • मानवी शरीराचे सामान्य तापमान ३७ अंश सेल्सियस किंवा ९८.६ अंश फॅरनहाईट असते. जर शरिराचे तापमान सामान्य पेक्षा जास्त असेल तर तो ताप असतो.

  • ताप का येतो
  • शरीरात रक्तातल्या पांढ-या पेशींची रोगजंतूंविरुध्दची लढाई चालू असते.

  • ताप मोजणे
  • तापमापक नसेल तर माणसाला ताप कळण्यासाठी आपल्या दोन हातांचा वापर करून तुलना करता येते.

  • तापाचे प्रकार
  • तापाचे मुख्य प्रकार तीन आहेत.

  • तापाचे रोगनिदान : तक्ता आणि मार्गदर्शन
  • ताप हे लक्षण अनेक संस्थांशी निगडित असल्याने त्याचे नेमके रोगनिदान केल्याशिवाय योग्य उपचार करता येत नाहीत.

  • तापावर उपचार
  • साधारण किंवा मध्यम ताप असेल तर केवळ कोमट पाण्याने अंग पुसून ताप कमी करता येतो.

  • थायरॉईड रोग
  • थायरॉईड ही एक लहान ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती मानेच्या खालच्या भागात स्थित असते. तिचं मुख्य कार्य म्हणजे शरीराच्या चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवणे.

  • दमा
  • 'दमा' म्हणजे 'दम लागणे' किंवा 'श्वास लागणे'. लहान मुलांच्या बाबतीत 'पोट उडणे', 'पोटात येणे' असेही शब्दप्रयोग वापरले जातात. दम लागण्याची कारणे अनेक आहेत.

  • परजीवी कृमी संक्रमण
  • परजीवी (कृमी) हे असे प्राणी असतात जे मूळ जीवाच्या शरीरात शिरतात, स्वतःला बाहेरुन तसंच आतून चिटकवून घेतात आणि त्या जीवाच्या शरीरातून पोषकद्रव्य शोषून घेतात. कृमी (सूत्रकृमी) हे लांब, उघडे, आणि हाडंविरहीत प्राणी असतात.

  • पोटशूळ
  • पोटशूळ : उदरगुहेतील अंतस्त्यांच्या विकृतीमुळे उद्‌भवणाऱ्या व पोटात उत्पन्न होणाऱ्या वेदनांना पोटशूळ म्हणतात.

  • प्राण्यांचे चावे
  • या घटकात प्राण्यांनी चावा घेतल्यामुळे होणारे आजार, लक्षणे, प्रथमोपचार आणि त्यावर करता येणारे उपाय याची माहिती दिली आहे.

  • बध्दकोष्ठ
  • बध्दकोष्ठ ही समस्या मलविसर्जनाच्या सवयीतील बदल दर्शवते, ज्यामधे, मलाचे प्रमाण कमी होते, मल घट्ट होतो, मलविसर्जनाची वारंवारता कमी होते, किंवा मल विसर्जन करताना खूप कुंथावं लागतं.

  • भोवरी
  • भोवरी : तळपाय व पायाच्या बोटांवर, बोटांमध्ये किंवा तळभागाकडील त्वचेमध्ये, बाह्यत्वचेतील शृंगस्तरापासून घर्षण किंवा दाब यामुळे होणाऱ्या शंक्वाकार छोट्या आकारमानाच्या कठीण गाठीला ‘भोवरी’ म्हणतात.

  • मधुमेह
  • मधुमेह याचा अर्थ लघवीत साखर असणे. मधुमेह या आजारात रक्तातले साखरेचे प्रमाण इतके वाढलेले असते, की मूत्रपिंडातून काही प्रमाणात साखर लघवीत उतरते.

  • मधुमेहातील आहार
  • मधुमेह झालेल्या व्यक्तींसाठी योग्य आहार कोणता , तो कसा कसा असावा आणि कुठले खाद्य पदार्थ टाळावेत या गोष्टींची माहिती यामध्ये दिली आहे.

  • मलावरोध
  • मलावरोध : मलोत्सर्जन मलोत्सर्ग अनियमित असून कठीण व शुष्क मल बाहेर पडताना सर्वसाधारणपणे कुंथावे लागून थोडाफार त्रास होणाऱ्या लक्षणाला ‘मलावरोध’ म्हणतात. सर्वसाधारणपणे निरोगी माणसात दिवसातून एकदा मलोत्सर्जन विनासायास होते.

  • मलोत्सर्ग
  • मलोत्सर्ग : अन्नाचे पचन व अभिशोषण या क्रिया आंत्रमार्गात जवळजवळ पूर्ण झाल्यानंतर, त्यातील उरलेला निरूपयोगी भाग ज्या शरीरवैज्ञानिक क्रियेने शरीराबाहेर टाकला जातो तिला‘मलोत्सर्ग’ अथवा ‘मलविसर्जन’ अथवा ‘मलोत्सर्जन’ म्हणतात.

  • मस्तिष्का वरणशोथ
  • मस्तिष्का वरणशोथ : (मेनिंजायटीस). मेंदू व मेरुरज्जू (पाठीच्या कण्यातून जाणारा तंत्रिकांचा-मज्जातंतूंची-दोरीसारखा जुडगा) यांवरील कलामय (पातळ पटलामय) आवरणांच्या दाहयुक्त सुजेला मस्तिष्कावरणशोथ म्हणतात.

  • रक्तदाब
  • आभिसरण होत असलेल्या रक्ताव्दारे रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींवर पडणारा दबाव म्हणजे रक्तदाब होय. 

  • रक्तपांढरी (ऍनिमिया)
  • रक्तपांढरी हा आजार आपल्या देशातला एक प्रमुख आजार आहे.

  • रक्तस्रावाची प्रवृत्ती
  • शरीरात एखाद्या ठिकाणी कापले तर रक्तस्राव सुरू होतो रक्तस्राव थांबावा म्हणून शरीरातून तीन प्रकारचे प्रयत्न होतात.

  • लठ्ठपणा
  • लठ्ठपणा या स्थितीत शरीरातील अडीपोज ऊतींमधे अतिरीक्त प्रमाणात चरबी जमा होते आणि आवश्यक वजनापेक्षा 20 टक्के अधिक वजन वाढते.

  • वय वाढणे
  • मनुष्याचा जन्म होतो तेव्हापासून वय वाढणे सुरु होते. एक मूल पक्व होऊन प्रौढ बनते. कार्य कमी होऊन अंततः मृत्यु येतो त्या स्थितीला सामान्यतः वय वाढणे असे म्हणतात.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate