ग्रामीण भारताच्या सबलीकरणास समर्पित असलेल्या www.vikaspedia.gov.in / www.vikaspedia.in ह्या बहुभाषिक पोर्टलकडे नेणारी लिंक आपण आपल्या वेबसाइटवर ठेवल्यास आम्हाला आनंद होईल. तसेच अशी लिंक ठेवण्यासाठी आम्ही आपणांस प्रोत्साहन देऊ इच्छितो. ह्या पोर्टलवर ग्रामीण दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या शेती, आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, ऊर्जा आणि इ-शासन ह्या सहा विषयांसंबंधीची विविध भाषांतील माहिती आणि सेवासुविधांचा समावेश आहे.
खाली दिलेल्या आमच्या लिंकिंग धोरणानुसार www.vikaspedia.gov.in / www.vikaspedia.in ही साइट आपल्या वेबसाइटपासून लिंक करण्यासाठी कोणत्याही पूर्वपरवानगीची गरज नाही. तरीदेखील ह्या पोर्टलवरून पुरवल्या गेलेल्या लिंक्सबाबत आपण आम्हांस (आमच्याशी संपर्क साधा हा पर्याय वापरून) कळवावे अशी आमची विनंती आहे ज्यायोगे पोर्टलमध्ये काही फेरबदल किंवा अद्यतन झाल्यास तशी सूचना आपणांस मिळू शकेल.
खाली पुरवलेल्या चित्रमय पताकांमधून (बॅनर्स) एक निवडण्यासाठी आम्ही आपणांस प्रोत्साहन देत आहोत. ही पताका आपल्या वेबसाइटवर सोयीस्कररीत्या ठेऊन आमच्या पोर्टलशी लिंक करता येईल. ही पताका खालील URLs ना हायपरलिंक करता येईल.
आपल्या वेबसाइटवर वापरण्यासाठी खालील प्रतिमांपैकी एखादी उतरवून घ्या. कृपया ध्यानात ठेवा की खालील पताकांच्या प्रतिमांचा वापर फक्त www.vikaspedia.gov.in च्या प्रसारासाठी व लिंक करण्यासाठी केला जाणे अपेक्षित आहे, भारत सरकारशी संबंधित घटकांना समर्थन अथवा मान्यता देण्यासाठी नाही. प्रत्येक पताकेसोबतच्या रचनात्मक परिमाणांचे कृपया पालन करा ज्यायोगे प्रतिमा इच्छित निकषांनुसार दिसेल व तिचे कोणतेही विकृतिकरण होणार नाही.
Banner and it's Specifications | |
---|---|
50X50 px; Color PNG |
|
100X100 px; Color PNG |
|
150X150 px; Color PNG |
|
200X200 px; Color PNG |
|
250X250 px; Color PNG |
ह्या पोर्टलवर दर्शवल्या जाणार्या माहितीशी आपण थेट लिंक झाल्यास आमची हरकत नाही तसेच त्यासाठी पूर्वपरवानगीचीही गरज नाही. तरीदेखील ह्या पोर्टलवरून पुरवल्या गेलेल्या लिंक्सबाबत आपण आम्हांस अशी आमची विनंती आहे ज्यायोगे पोर्टलमध्ये काही फेरबदल किंवा अद्यतन झाल्यास तशी सूचना आपणांस मिळू शकेल.. तसेच आमच्याकडील पृष्ठे आपल्या साइटवर, फ्रेम्सच्या रूपात, ठेवण्यास परवानगी नाही. ह्या पोर्टलच्या मालकीची पृष्ठे वापरकर्त्याच्या नव्याने उघडलेल्या ब्राउझर विंडोमध्येच ठेवली जाणे आवश्यक आहे.
बाह्य वेबसाइट्स / पोर्टल्सवरील लिंक्सह्या पोर्टलवर अनेक ठिकाणी आपणांस अन्य वेबसाइट्स / पोर्टल्सवरील लिंक्स आढळतील. ह्या लिंक्स आपल्या सोयीसाठी देण्यात आल्या आहेत. लिंक केलेल्या वेबसाइट्सची विश्वसनीयता तसेच त्यांवरील आशयाची कोणतीही जबाबदारी C-DAC घेत नाही आणि त्यांवर व्यक्त केलेल्या विचारांचे किंवा मतांचे समर्थन करीत नाही. सदर पोर्टलवर लिंक्स फक्त दर्शवल्या जाणे किंवा सूचित केल्या जाणे ह्याचा अर्थ त्यांना कोणत्याही प्रकारचे समर्थन दिले आहे असा नव्हे. ह्या लिंक्स सतत चालू असण्याची तसेच लिंक केलेली पृष्ठे उपलब्ध असण्याची कोणतीही खात्री आम्ही देत नाही कारण त्या प्रक्रियांवर आमचे कोणतेही नियंत्रण असू शकत नाही.
अंतिम सुधारित : 10/7/2020