मनुष्याचा जन्म होतो तेव्हापासून वय वाढणे सुरु होते. एक मूल पक्व होऊन प्रौढ बनते. कार्य कमी होऊन अंततः मृत्यु येतो त्या स्थितीला सामान्यतः वय वाढणे असे म्हणतात.
लोक वृध्द होतात तसे मेंदूतील चेतापेशी संख्येनं थोड्या कमी होतात. हे भरुन काढण्यासाठी अनेक गोष्टी कार्यरत होतात. या बदलांमुळे, मेंदूचं कार्य थोडंसं कमी होतं. त्यामुळं वृध्द लोक प्रतिसाद किंवा कामं अधिक हळू करतात. त्यांना शब्द आठवत नाहीत, अल्पकालीन स्मृती कमी होते, नव्या गोष्टी शिकण्याची क्षमता मंदावते.
साठीनंतर, पाठीच्या कण्यातील पेशींची संख्या कमी होऊ लागते. परिणामी, त्यांना संवेदना कमी झाल्याचे जाणवते. त्यामुळं, वृध्द लोकांना जखमा किंवा विकृती सहजपणे होतात.
वृध्दत्वानुसार, प्रतिकार यंत्रणेचा प्रभाव कमी होऊ लागतो. त्यामुळे कर्करोग आणि संक्रमणे, जसे न्यूमोनिया आणि इन्फ्लुएन्झा सारखे रोग होतात.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 8/7/2023
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...