अॅलर्जी म्हणजे निसर्गात असलेल्या काही घटकांना शरीर प्रतिबंध करते, त्यालाच अॅन्टीजेन असेही म्हणतात. प्रतिकारशक्ती कमी झाल्याने दिसून येणारी लक्षणं म्हणजे श्वास लागणे, कफ, शिंका, वाहणारे नाक आणि खवखवणारा घसा, त्वचेवर रॅश(पुरळ) उठणे, खाज येणे, पित्त इ. अनेक केसेसमध्ये याची परिणती रक्तदाब कमी होणे, दम्याचा त्रास उसळणे किंवा कधी कधी मृत्यू होण्यातही होते. अॅलर्जी टाळण्यासाठी चाचणी आवश्यक असून यातून पुढे होणारी हानी टाळता येते आणि योग्यवेळी अचूक औषधं देण्याचा सल्ला महत्त्वपूर्ण असतो. अॅलर्जीसंबंधी चाचणीत स्किनिंग टेस्ट केली जात असून यातून संबंधित व्यक्तीला अॅलर्जी आहे की नाही हे समजून येते.
चाचणीचा निष्कर्ष जर सकारात्मक आला तर लक्षणं, वय, वातावरण, भौगोलिक परिस्थिती, वैद्यकीय इतिहास या सर्वानुसार रुग्णाला पॅनल टेस्टला सामोरे जावे लागतं. यातूनच नेमका अॅलर्जीचा त्रास संबंधित व्यक्तीला का होत आहे हे दिसून येतं. विविध प्रकारची पॅनल्स असून यामध्ये गंध, अन्न, पर्यावरण, भौगोलिक परिस्थिती आदींचा समावेश असून ७०० हून अधिक प्रकारच्या अॅलर्जी आपल्याला चाचण्यांमधून दिसून आल्या आहेत. ही पद्धती यूएस एफडीएने मान्य केलेली असून या चाचण्यांच्या निष्कर्षावर अॅण्टी-हिसटॅमिन्सचा कोणताही परिणाम होत नाही. देशातील अॅलर्जी पॅटर्नची तीव्रता समजून घेण्याकरता पॅथॉलॉजिस्ट स्पेशॅलिस्ट मेट्रोपोलिस हेल्थकेअर लि. यांनी सर्वसमावेशक अभ्यास करून २०,२९३ चाचण्या २०१४ मध्ये केल्या. या नमुन्यांपैकी १५.७९ टक्के जणांच्या रक्ताच्या नमुन्यात अॅलर्जीचे सकारात्मक निष्कर्ष आढळून आले.
या अभ्यासावरून दिसून येते की अॅलर्जी असणा-यांमध्ये विविध प्रकार दिसून येतात. ४३.९३ टक्के रुग्णांना धूळीची अॅलर्जी असते. त्यानंतर फुलातील पराग, बुरशी आणि प्राण्यांचा राग याची अॅलर्जी अनुक्रमे २०.६३ टक्के, १०.५० टक्के आणि १०.३१ टक्के इतकी असते.
सकारात्मक सर्व नमुन्यांचे परीक्षण केले असता खालील निष्कर्ष दिसतो.
अन्न न पचल्याने दिसून येणा-या प्रतिकियेशी फूड अॅलर्जीची सांगड घालणं खूपच सोपं असतं. आज अॅलर्जीकरता होणा-या रक्ताच्या चाचण्या या पूर्वीच्या तुलनेत अधिक सुलभ आणि अचूक असतात. विस्तृत वैद्यकीय इतिहासाशी तुलना करता अॅलर्जीसंबंधी चाचण्यांमुळे तुम्हाला कोणती अॅलर्जीक रिअॅक्शन कशामुळे आली आहे हे अचूकपणे दिसून येते.
- डॉ. दीपक संघवी, उपप्रमुख, लॅब सर्व्हिसेस, मेट्रोपोलिस हेल्थकेअर लि., मुंबई.
स्त्रोत : प्रहारअंतिम सुधारित : 10/7/2020
अल्सर म्हणजे काय, अल्सर कशाने होतो , अल्सरची लक्षण...
बहुतेक सर्वांनाच कधीतरी डोकेदुखी होत असते, आणि काह...
केस गळण्याच्या समस्यामधे केस विरळ होणे ते पूर्ण टक...
सर्दी-पडसे ही अगदी सामान्य तक्रार आहे. सर्व वयाच्य...