অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

केस गळणे

केस गळण्याच्या समस्यामधे केस विरळ होणे ते पूर्ण टक्कल पडणे यांचा समावेश असतो.  केस अनेक कारणांमुळ गळू शकतात.  वैद्यकीयदृष्ट्या, केस गळणे हे अनेक श्रेणींमधे विभागता येते, त्यामधेः

  1. दीर्घकाळ चाललेला आजार, मोठी शस्त्रकीया किंवा गंभीर संक्रमण यांसारख्या प्रमुख शारीरिक तणावानंतर दोन ते तीन महिन्यांत केस गळणे ही सामान्य स्थिती आहे.  संप्रेरकांच्या पातळीत अचानक बदल होणे, विशेषतः महिलांमधे प्रसुतिनंतर असा बदल होण्यानं केस गळतात.  मध्यम प्रमाणात केस गळतात परंतु मोठ्या प्रमाणात चट्टे पडणे हे दुर्मिळ आहे.
  2. औषधांचे दुष्परिणाम : ठराविक औषधांच्या दुष्परिणामांमुळं केस गळू शकतात आणि अचानक केस गळून संपूर्ण डोके प्रभावित होऊ शकते.
  3. एखाद्या वैद्यकीय आजाराचे लक्षण – थायरॉईड समस्या (जसे हायपोथायरॉईडीझम किंवा हायपरथायरॉईडीझम), लैंगिक संप्रेरकांचं असंतुलन किंवा एखादा गंभीर पोषणात्मक आजार, विशेषतः प्रथिनं, लोह, जस्त किंवा बायोटीन यांची कमतरता  अशा प्रकारच्या वैद्यकीय आजारांमुळं केस गळणे हे एक लक्षण दिसू शकते.  मर्यादित आहार घेणारे लोक किंवा ज्या स्त्रियांना अतिप्रमाणात मासिक स्त्राव होत असेल त्यांना या कमतरता अधिक प्रमाणात दिसून येतात.
  4. टकलावर बुरशीचं संक्रमण – ठराविक प्रकारच्या बुरशीमुळं टकलावर संक्रमण होतं त्यामुळं केस गळून चट्टे पडतात.  मुलांमधे असे केस गळून चट्टे पडणं सामान्य आहे.
  5. अनुवांशिक पध्दतीनं टक्कल पडणे – पुरुषांमधे, केस गळण्याची पध्दत विशिष्ट प्रकारे होते (डोक्याच्या शीर्षभागापासून केस गळायला किंवा पातळ व्हायला सुरुवात होणे).  सामान्यतः अशाच प्रकारे केस गळतात, आणि पुरुषाच्या आयुष्यात कोणत्याही वयात त्याची सुरुवात होऊ शकते, अगदी त्याच्या पौगंडावस्थेत देखील. असे साधारणतः तीन घटकांच्या आंतरक्रियेमुळं होतं टक्कल पडण्याची अनुवांशिक धारणा, पुरुषी संप्रेरक आणि वाढतं वय. स्त्रियांमधे, डोक्याचा वरचा संपूर्ण भाग किंवा चोटीचा भाग विरळ होऊ शकतो, फक्त कपाळावरचा भाग सोडून.

लक्षणे

आपण सामान्यतः दररोज टकलावरचे 50 ते 100 केस गमावतो.  केस यापेक्षा अधिक प्रमाणात गळत असतील तर ते चिंतेचं कारण आहे.  आपल्याला असंही लक्षात येईल की केस हे साधारणतः पातळ होऊ लागले आहेत आणि एक किंवा अधिक टकलाचे चट्टे दिसू लागले आहेत.

प्रतिबंध

तणाव कमी करुन, चांगला आहार घेऊन आणि विचारपूर्वक हेयरड्रेसींगचं तंत्र वापरुन, आणि शक्य झाल्यास, केसगळती न होऊ देणारी औषधं घेऊन काही प्रकारची केसगळती ही टाळता येऊ शकते. बुरशीच्या संक्रमणापासून होणारी केसगळती ही केस स्वच्छ ठेवून आणि आपली टोपी, कंगवे किंवा ब्रश इतरांसोबत न वापरुन टाळता येऊ शकते. अनुवांशिक पध्दतीनं येणारं टक्कल काहीवेळा औषधांनी टाळता येऊ शकतं.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 8/8/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate