प्राणी चावण्याने सामान्य जखमा होतात किंवा जीवाला घातक जखमांचा संसर्ग होतो.
बहुतांश प्राण्याच्या चाव्यात कुत्रा चावण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यानंतर क्रमांक लागतो मांजराच्या चाव्याचा. मांजराच्या चाव्यामुळे होणा-या संक्रमणाचा धोका कुत्र्यापेक्षा जास्त असतो. अन्य संभाव्य चाव्यांमधे साप आणि माकड चावण्याचा समावेश आहे.
प्राणी चावल्यानंतर सर्वाधिक चिंता असते ती रेबीजची. कुत्रा चावणे हे रेबीजचे सर्वात सामान्य कारण आहे.
एखाद्या चाव्याने त्वचा फाटली नाही तरी, त्याखालील हाड, स्नायू, आणि नसा तुटणे आणि जखम होते. त्वचा फाटली तर, संक्रमणाची आणखी एक शक्यता असते.
चावलेला भाग तोंडात घेऊ नये. तोंडात विषाणू असतात, ते संक्रमण करु शकतात.
वरवरच्या जखमांसाठी, संबंधित भाग साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवा किंवा अँटीसेप्टीक लावा, जसे, हायड्रोजन पेरॉक्साईड किंवा अल्कोहोल. प्रतिजैविक मलम लावावे आणि जखम ही न चिटकणा-या बँडेजनी झाकावी.
त्या भागात नसा किंवा कंडराचे नुकसान झाले आहे का ते बारकाईने तपासावे. ती जखम एक आठवडा किंवा दहा दिवसात बरी झाली पाहिजे. नाही झाल्यास, तिथे, नसा आणि कंडराच्या संक्रमण किंवा नुकसानाची चिन्हे असतील तर, वैद्यकीय मदत घ्यावी.
संबंधित भागावर स्वच्छ कापडाने दाबून धरावे आणि तो भाग उंच राहील असा ठेवावा. एखाद्या भागात फार रक्तस्त्राव नसेल तर तो स्वच्छ करण्याची गरज नाही. जखम ही स्वच्छ निर्जंतुक ड्रेसिंगने झाकावी आणि वैद्यकीय मदत घ्यावी. जखम ही जर तोंड, डोके, किंवा मानेला झाली असेल तर, तत्काळ वैद्यकीय मदत घ्यावी.
साप थंड रक्ताचे असतात. त्यामुळे, बाहेर थंड असेल तर ते आपल्या शरीराचं तापमान वाढवून क्रियाशील राहू शकत नाहीत.
साप चावण्याचे प्रकारः कोब्रा आणि फुरसे या दोन जाती मानवासाठी सर्वात विषारी आहेत.
विषारी साप चावल्याने अनेक प्रभाव होतात, त्यामधे साध्या जखमा ते जीवघेणे आजार आणि मृत्यु यांचा समावेश असतो. साप चावल्यानंतर दिसणारी लक्षणे दिशाभूल करु शकतात. रुग्णाला प्रारंभी लक्षणीय लक्षणे दिसतात, आणि नंतर अचानक श्वास घ्यायला त्रास होतो आणि शॉक बसतो.
वैद्यकीय मदत केव्हा घ्यावी
चावलेला साप हा बिनविषारी आहे हे हमखास माहिती असेल तर, अन्यथा रुग्णाला तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल करावे. साप ओळखण्यात चूक झाली तर जीवघेणी चूक होऊ शकते.
बिनविषारी सापांनी केलेल्या जखमेची चांगली काळजी घ्यावी लागते. रुग्णाने गेल्या पाच वर्षात धनुर्वाताचे इंजेक्शन घेतले नसल्यास त्याला एक बूस्टर डोस देण्यात यावा.
रेबीजचा विषाणू हा तुटलेली त्वचा आणि सुदृढ म्युकोसाला भेदू शकतो. भटक्या प्राण्यांकडून माणसांना सामान्यतः संक्रमण होते. दक्षिण अमेरिकेत गुहेत राहणा-या वटवाघुळांकडून श्वसनावाटे विषाणूचा प्रसार होतो असे आढळून आले आहे. नेत्रभिंग प्रत्यारोपणाव्दारे रेबीजचा प्रसारसुध्दा अलीकडे नोंदवण्यात आला आहे.
चाव्यातून शिरलेला विषाणू स्नायूंच्या तंतूत अनेकपटीने वाढतो. चेतास्नायू आणि न्यूरोटंडीनल स्पिंडलमधे तो जमा होतो आणि काही दिवस किंवा आठवड्यांनी तो बाह्य नसांमधे शिरतो. अंततः, तो केंद्रीय चेता संस्थेत जातो जिथून तो सीएसएफ व्दारे पसरतो.
अक्रियाशील राहण्याचा कालावधी चार दिवस ते अनेक वर्षांपर्यंत राहतो. तथापि, नव्वद टक्के रुग्णांमधे, तो तीस ते नव्वद दिवसांपर्यंत राहतो. तोंडावर चावा असेल तर हा काळ कमी (सरासरी पस्तीस दिवस) राहतो तर हाता-पायांवर चावा असल्यास सरासरी बावन्न दिवस राहतो.
भयंकर किंवा मुक्त रेबीज
रेबीजचा हा सर्वात सामान्य प्रकार आहे. यामधे, स्नायूंची अति हालचाल, कंप, झटके आणि श्वास लागणे दिसून येते. कंठात अवरोध झाल्यास रुग्णाला अन्न गिळता येत नाही. पाण्याची भिती वाटते, हवेची भिती वाटते आणी लाळ वाढते.
या प्रकारचा रेबीज एक-पंचमांश प्रकरणी दिसतो. लक्षणांमधे, हाता-पाय लुळे पडणे, याची सुरुवात चावा घेतलेल्या अवयवापासून होते. निश्चल रेबीज हा अनेकदा एन्सीफिलायटीस म्हणून चुकून समजला जातो.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 6/3/2020
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...