অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दमा

दमा

दमा हा एक तीव्र स्वरुपाचा आजार असून तो आपल्या श्वसनमार्गांवर परिणाम करतो. श्वसनमार्ग म्हणजे त्या नळ्या असतात ज्या तुमच्या फुफ्फुसातून हवा आत-बाहेर नेण्याचं काम करतात. आपल्याला दमाविकार असेल तर आपल्या श्वसनमार्गांच्या आतील भिंतींचा दाह होतो (त्या सुजतात). या दाहामुळं ते श्वसनमार्ग खूपच संवेदनशील बनतात, आणि आपल्याला अलर्जी असलेल्या वस्तुंना किंवा आपल्याला त्रासदायक वाटणा-या गोष्टीवर ते तीव्र प्रतिक्रीया देतात. जेव्हा हे श्वसनमार्ग प्रतिक्रीया देतात तेव्हा ते आकुंचन पावतात आणि कमी प्रमाणात हवा आपल्या फुफ्फुसापर्यंत पोचते. त्यामुळे श्वास जडावणे (श्वास घेताना शिटी वाजवल्यासारखा आवाजे येणे), खोकला, छाती आवळून येणे आणि विशेषतः रात्री आणि सकाळी लवकर श्वास घेण्यात अडथळा येणे अशी लक्षणे दिसून येतात.

दमा हा पूर्णतः बरा करता येत नाही, परंतु दमा असलेले बहुतांश लोक त्याला नियंत्रणात ठेवू शकतात जेणेकरुन त्यांना थोडी आणि कमी वारंवारतेनं लक्षणं उद्भवतात आणि ते क्रियाशील जीवन जगू शकतात. सामान्य रक्तवाहिनी दमा असलेल्या व्यक्तीमधील हवेचा मार्ग स्नायू आवरण सूज घट्ट स्नायू श्लेष्मा दम्याचे अटॅक हे सगळे एकसारखे नसतात – काही अटॅक हे इतरांपेक्षा भयानक असतात.  एका तीव्र दमा अटॅकमधे, हवेचा मार्ग इतका बंद होतो की पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन महत्वाच्या अवयवांपर्यंत पोचू शकत नाही. अशी स्थिती वैद्यकीयदृष्टया आपात्कालीन असते.  तीव्र स्वरुपाच्या दमा अटॅकमधे लोकांचा जीव जाऊ शकतो.

त्यामुळे आपणास दमा असल्यास, आपण आपल्या डॉक्टरांना वारंवार भेटले पाहिजे.  कोणत्या गोष्टी आपल्यात दम्याची लक्षणे निर्माण करतात आणि त्यांना कसे टाळावयाचे हे शिकून घेण्याची आपल्याला गरज आहे.  आपला दमा आटोक्यात ठेवण्यासाठी आपले डॉक्टर औषधे लिहून देतील.

कारणे

वातावरणामधे अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्यामधे दम्याची लक्षणे निर्माण करतात आणि त्यामुळे दम्याचा अटॅक येतो.  अधिक सामान्यपणे होणा-या या गोष्टींमधे व्यायाम, अलर्जीकारक, त्रासक, आणि विषाणू संक्रमणांचा समावेश होतो.  काही लोक जेव्हा ते व्यायाम करतात किंवा त्यांना विषाणूचे संक्रमण होते तेव्हा त्यांना दम्याचा अटॅक येतो.

  • प्राण्यांची धूळ (त्यांची त्वचा, केस, किंवा पंख)
  • धूळीतील विषाणू
  • झुरळे
  • वनस्पती आणि गवतांचे परागकण
  • बुरशी (घरातील आणि बाहेरील)
  • सिगारेटचा धूर
  • हवेचे प्रदूषण
  • थंड हवा किंवा हवामानातील बदल
  • रंगकाम किंवा स्वयंपाकामुळं निघणारे तीव्र वास
  • सुगंधी उत्पादने
  • तीव्र स्वरुपाचे भावनिक प्रदर्शन (रडणे किंवा जोरात हसणे) आणि तणाव
  • अस्पिरीन किंवा बीटा-ब्लॉकर्ससारखी औषधे
  • अन्नातील सल्फाईटस् (सुकामेवा) किंवा शीतपेये (मद्य)
  • गॅस्ट्रो इसोफॅजील नांवाची स्थिती – यामधे छातीत जळजळ होते आणि विशेषतः रात्रीच्यावेळी दम्याची लक्षणे अतितीव्र होतात.
  • कामाच्या ठिकाणी आपल्याला होणारा त्रासक किंवा अलर्जीकारकांचा प्रादुर्भाव, जसे विशेष रसायनं किंवा धूळ
  • संक्रमणे
  • कौटुंबिक इतिहास
  • तंबाकूच्या धुराचा सहवास असलेल्या बाळांना दमा होण्याची अधिक शक्यता असते.  एखाद्या महिलेला गर्भावस्थेत तंबाकूच्या धूराचा प्रादुर्भाव झाला असेल, तर तिच्या बाळालाही दमा होण्याची अधिक शक्यता असते.
  • लठ्ठपणा तसंच अन्य आरोग्य समस्या यांचाही दम्याशी संबंध असू शकतो.

चिन्हे आणि लक्षणे

  • घरघरणे
  • सामान्यतः अचानक सुरु होते
  • वारंवार होते
  • रात्रीच्या वेळेला किंवा पहाटे तीव्रता वाढ्ते
  • थंड ठिकाण, व्यायाम आणि छातीत जळजळ यमुळे अधिक तीव्र होते.
  • आपोआपच कमी होते.
  • थुंकीसह किंवा त्याविना खोकला
  • श्वास लागणे आणि व्यायाम किंवा कामानुसार आणखी तिव्र होणे
  • फासळ्यामधील त्वचा श्वासासोबत ओढली जाणे
  • ब्रॉन्कोडायलेटर्सने (श्वसनमार्ग मोकळा करणारी औषधे) सुटका करता येते

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

आरोग्यविद्या-दमा या रोगाविषयी अधिक माहिती

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate