तापाच्या अनेक अवस्था असतात. ताप सुरु होत असताना भूक कमी होते. त्यावरून प्रौढांसाठी लंघन हा प्रथम महत्त्वाचा उपचार ठरतो. रोगनिदान नेमके असल्यास तापासाठी वेगळा योग्य उपचार असतोच. ताप असताना गोदंती मिश्रण (गोदंती व जहर मोहरा पिष्टी) 200 ते 300 मि ग्रॅ. दिवसातून 3-4 वेळा देणे उपयोगी ठरते. ताप उतरताच या पुडया थांबवाव्यात. थंडी भरून ठरावीक वेळाने मधून मधून येणारा ताप असतो. अशा वेळी काढेचिराईत उपयोगी आहे. या गोळयांनी थंडीताप आटोक्यात येतो. अनेकदा इतर उपचारांनी जोरदार ताप नियंत्रित होतो, पण काहीजणांना 99 अंशाच्या आसपासचा ताप सतत राहतो. त्या वेळी गुडुचिघनवटी, संशमतीवटी ह्या 64 मि.ग्रॅ. च्या चार ते आठ गोळया 3-4 वेळा वापराव्यात. याने अंगात मुरलेल्या जुनाट तापाचे तीन चार दिवसांत निराकरण होते.
जुनाट ज्वरात त्वचेला, शरीराला कोरडेपणा येतो. अशा अवस्थेत कडू औषधाची तुपे उपयोगी पडतात. तित्तक तूप 15-20 मि.ली. ह्या प्रमाणात, सकाळी रिकाम्या पोटी चार ते सहा दिवस द्यावे.
ताप हे सर्वात सामान्य आणि महत्त्वाचे रोगलक्षण आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...