आईच्या मागील पाळीपासून ते जन्मापर्यंत 37 आठवडे होऊन गेले असतील तरच जन्मलेल्या मुलाला 'पूर्ण दिवसांचे' म्हणता येईल.
रक्ताचा लालपणा कमी होणे म्हणजे अॅनिमिया. यालाच रक्तक्षय किंवा रक्तपांढरी असे हि म्हणतात.
या विभागात लहान मुलांना आईच्या दुधाचे काय फायदे आहेत याची माहिती दिली आहे.
आजीबाईचा बटवा-इतर आजारांसाठी
आजीबाईचा बटवा-लहान मुलांमधील पोटदुखी
उन्हाळ्याचा त्रास हा सगळ्यांनाच होतो. पण लहान मुलांना त्रास हा त्यांना प्रत्येक वेळेला शब्दात मांडता येत नाही. त्यासाठी आपणच काही उपाय करावेत.
आजीबाईंच्या बटव्यात दिलेले उपाय प्राथमिक स्वरूपाचे आहेत, आजार गंभीर वाटल्यास लगेच रोग्याला डॉक्टरांकडे घेऊन जा.
मुले हेच राष्ट्राचे भवितव्य असते. मुलांचे आरोग्य, पोषण आणि वाढ हे देशाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
ब-याच मुलांना हा आजार 'जन्मजात' असतो. काही जणांना नंतर दोन अडीच वर्षात होतो.
पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तीला कुपोषण म्हणतात. व त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल.
'कुपोषणमुक्तीसाठी रानभाज्यांचा उपयोग' या विषयावर दिलखुलास कार्यक्रमातून श्रीमती इंदवी तुळपुळे यांनी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया...
गालगुंड हा विषाणुजन्य आजार सहसा लहान मुलांमध्ये (पाच-सहा वर्षे) येतो. हा आजार लहान वयात आला नाही तर मोठया वयात येण्याची शक्यता असते.
बाळ न रडल्यास अम्बू बॅग व मास्क वापरून कृत्रिम श्वास द्यावा. बॅग व मास्क नसेल तर बाळाच्या नाक व तोंडावर पातळ कपडा घालावा.
हा गोवरासारखाच पण अगदी सौम्य आजार असतो, म्हणून याला 'लहान गोवर'असेही म्हणता येईल.
अ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होणारे आजार हल्ली कमी झाले आहेत. याला कारण अ जीवनसतवाचा वाटपाचा कार्यक्रम.
जुनाट मायलोसायटिक ल्यू्केमिया (CML) कोणत्या ही वयोगटाच्यास आणि लिंगाच्या व्याक्तीस प्रभावित करू शकतो पण 10 वर्षांपेक्षा लहान असलेल्या मुलांमध्यें हा असामान्य आहे.
पाच वर्षाखालील (विशेषतः दोन वर्षाखालील) मुलांना होणारा हा एक गंभीर आजार आहे.
काही मुलांना तापाबरोबर झटके येतात, डोळे फिरवणे,मुठी आवळणे, इत्यादी लक्षणे दिसतात.
वजन व उंची वाढण्याचा वेग तीन ते पाच वर्षे या वयामध्ये कमी असतो
कुपोषणाचे दोन मुख्य प्रकार म्हणजे सर्वांगसूज व रोडपणा. हा अचानक होणारा आजार नव्हे
ल्युकेमिया एक जीवघेणा रोग आहे ज्यामध्ये सामान्यपणे लिंफोसाइट्सच्या स्वारूपात वाढणार्या पेशी कर्करोगाच्या स्वरूपात विकसित होतात आणि तीव्रतेने सामान्य पेशींच्या जागी अस्थिमज्जामध्ये (बोनमॅरोमध्ये) स्थिरावतात.
दमा फुफ्फुसाची एक पुनरावर्ती शोथ-अवस्था (ज्यायमध्ये फुफ्फसांवर सूज येते) आहे.
दुस-या वर्षभरात बाळाचे वजन सुमारे 2.5 किलोने वाढते, उंची 10 ते 12 से.मी. वाढते.
नव्याने जन्मलेल्या अर्भकास प्रसूतीनंतरच्या पहिल्या चार आठवड्यांच्या काळात ‘नवजात अर्भक’ म्हणतात व या काळाला अर्भकाच्या संदर्भात ‘नवजात काल’ म्हणतात.
जन्मल्यानंतर स्वतंत्र श्वसनक्रिया सुरू होणे ही बाळासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते.
नवजात बालकांची काळजी कशी घ्यावी यासंबधी आणखी माहिती यामध्ये दिली आहे
या विभागात बाळ जन्मल्याबरोबर काय आणि कशी काळजी घ्यावी याची माहिती दिली आहे.
प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे संवेदना झाल्यावर मेंदूकडून आज्ञा न घेता चेतातंतू, चेतारज्जू व स्नायूंनी परस्पर पार पाडलेली हालचाल.
कधीकधी जन्मल्यावर काही तासांतच मुलांना चिकट फेसासारख्या उलटया होऊ लागतात.
या आजाराने खूप बाळे दगावतात. बालन्यूमोनिया हा फुप्फुसाच्या एका भागात जंतुदोष झाल्याने होणारा आजार आहे. यात खोकला, ताप, दम लागणे ही मुख्य लक्षणे असतात.