शरीरात रक्तातल्या पांढ-या पेशींची रोगजंतूंविरुध्दची लढाई चालू असते. या लढाईतून निघणा-या विषारी पदार्थामुळे ताप चढतो. ताप येण्यासाठी मेंदूच्या केंद्रातून आदेश मिळतो. ताप बहुधा जंतुदोषामुळे येतो. जंतुदोषामुळे निर्माण होणा-या काही रासायनिक पदार्थांची मेंदूतल्या तापमान-नियंत्रण-केंद्रावर क्रिया होऊन ताप येतो. तापामुळे शरीरातल्या रासायनिक क्रियांना वेग येतो. म्हणून काही प्रमाणात ताप हा मूळ आजार बरा होण्यासाठी आवश्यक आहे. राग आल्याशिवाय जशी लढाई होत नाही तशी तापाशिवाय जंतूंशी लढाई होत नाही. बारीक ताप असेल तर ताप उतरवण्याची आवश्यकता नसते. मात्र ताप जास्त असेल तर मेंदूवर परिणाम होऊ शकतो.
लहान मुलांना तापामुळे कधीकधी झटके येऊ शकतात. ताप किती आहे याबरोबरच कसा आहे हेही पाहणे महत्त्वाचे आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
तापाचे मुख्य प्रकार तीन आहेत.
मानवी शरीराचे सामान्य तापमान ३७ अंश सेल्सियस किंवा...
तापमापक नसेल तर माणसाला ताप कळण्यासाठी आपल्या दोन ...
हा विशिष्ट प्रजीवाच्या (एकच पेशी असलेल्या जीवाच्या...