सतत ताप म्हणजे आजाराच्या काळात अजिबात न उतरता कायम राहिलेला ताप. हा ताप विषमज्वर, कावीळ वगैरे आजारांमध्ये आढळतो.
आजाराच्या काळात एकदम चढणारा व एकदम पूर्णपणे (किंवा अर्धवट) उतरणारा ताप माहिती विचारून ओळखता येतो. थंडीताप याच प्रकारात येतो. यात आधी थंडी वाजते मग ताप येतो. मलेरिया, न्यूमोनिया,मूत्रपिंडाचा जंतुदोष, किंवा कोठेही पू असल्यास असा ताप दिसून येतो.
हे नाव चुकून पडले आहे. जेव्हा एखाद्याला बरेच दिवस सतत बारीक ताप येतो तेव्हा आपण 'ताप अंगात मुरला' किंवा 'हाडीताप' असे म्हणतो. शरीरात जेव्हा क्षयरोगासारखे दीर्घ दुखणे असते तेव्हा असा बारीक ताप कायम असतो. मात्र आधुनिक उपचारांमुळे याचे प्रमाण आता पुष्कळ कमी झाले आहे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 5/25/2020
एक म्हणजे नैसर्गिक गर्भपात जो आपोआप होतो आणि दुसरा...
गळ्यात मध्यभागी असलेल्या अषटू ग्रंथीची कोणत्याही क...
आरोग्यो व कुटुंब कल्यारण विभागाने २००६-०७ मध्येे क...
आंबट ढेकरा येणे, घशाशी जळजळ होऊन आंबट ओकारी होणे य...