অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ऊष्माघात

उष्माघात म्हणजे काय ?

उष्माघात म्हणजेच सुर्यघात. ही जीवघेणी अवस्था आहे ज्यात प्रखर तापमानाला सामोरे गेल्याने शारिरातील ऊष्णता- संतूलन संस्था नाकाम होते. वातावरणातील जास्त तापमान किंवा जोरदार गतिविधिंमुळे शरीर ते सहन करु शकले नाही तर असा ऊष्माघात होतो. जास्त तापमानामुळे शरीरातील महत्वाचे अवयव निकामी होतात.

ऊष्माघात हा ऊष्णतेने होणारा सर्वात घातक प्रकार आहे, अति व्यायामाने किंवा जास्त जड काम केल्याने आणि प्रमाणबद्ध तरल पदार्थांचे सेवन न केल्यामुळे हा होतो.

उष्माघात कोणाला होतो ?

जरी ऊष्माघात कोणालाही होऊ शकत असला तरी, काही लोक असा त्रास होण्यास पात्र असतात. ह्यात लहान मुले, खेळाडू, डायबेटीक, दारु पिणारे आणि जे प्रखर ऊन्हात आणि गर्मीत काम करतात अशांचा समावेश असतो. काही ठराविक औषधांमुळे काही व्यक्ति ऊष्माघातास अधिक प्रवण असतात.

ऊष्माघाताची लक्षणे आणि कारणे

ऊष्माघाताचे मुख्य लक्षण हे प्रमाणाबाहेर वाढलेले शारीरीक तापमान, मानसिक बदल आणि भ्रम आणि कोमा असे आहेत (१०४ डिग्री पेक्षा जास्त). त्वचा कोरडी आणि गरम होते — जर ऊष्माघात तणावामुळे होत असेल तर त्वाचा नरम होऊ शकते.

अन्य संकेत आणि लक्षणे खालील प्रमाणे आहे :

  1. हदयाची धडधड / ठोके वाढणे
  2. भरभर आणि दिर्घ श्वास
  3. रक्तचाप दर वाढणे किंवा खाली होणे
  4. घाम थांबणे
  5. चिडचिड, बेशुद्धी किंवा भ्रम
  6. चंचलता येणे किंवा ठोके हलके होणे
  7. डोकेदुखी
  8. मळमळ (ऊलट्या)
  9. बेशुद्धी, जी वयस्कांमध्ये पहिला संकेत होऊ शकते.

जर ऊष्माघात गंभीर असेल, तर खालील लक्षणे

  1. मानसिक भ्रम
  2. हायपरवेंटीलेशन
  3. शरीरात ताठरता
  4. हात आणि पायात आकड
  5. आक्रमकता
  6. खोल बेशुद्धी

प्रथमोपचार

  1. व्यक्तिला सुर्यापासून दुर करुन, थंडाव्याच्या किंवा सावलीच्या ठिकाणी आणावे.
  2. व्यक्तिला खाली झोपवावे आणि त्याचे पाय व हात सरळ करावे.
  3. कपडे सैल करावे किंवा काढून टाकावे.
  4. व्यक्तिला थंड पाणी पाजावे किंवा काही कॅफेन वा मद्य विरहीत पेय प्यावयास द्यावे.
  5. व्यक्तिचे शरीर थंड पाण्याचे शिबके मारुन किंवा थंड पाण्याच्या बोळ्याने अंग पुसुन काढून किंवा पंख्याखाली ठेवुन थंड करावे.
  6. व्यक्तिवर बारकाईने लक्ष ठेवावे. गर्मी तंद्रा ऊष्माघातात परिवर्तीत होऊ शकते.

जर ताप १०२ फेरेनाईट पेक्षा जास्त असेल, बेशुद्धी, भ्रम किंवा आक्रमकता यासारखी लक्षणे दिसुन आली तर, ताबडतोब मेडीकल सेवेचा लाभ घ्यावा.

ऊष्माघाता पासुन कसे वाचता येते ?

ऊष्माघातापासुन वाचण्यासाठी जास्तीतजास्त पेय प्या आणि खासकरुन बाहेरच्या गतीविधी करत असाल तर शरिरातील द्रव्याचे प्रमाण राखा आणि शरिर सर्व साधारण तापमानावर राहील हे पहा. कॅफीन आणि मद्यापासून दुर राहण्याचा प्रयत्न करा कारण त्यामुळे शरीरात कोरड पडते. सौम्य रंग आणि ढिले कपडे वापरा आणि शारीरातील पाण्याचे प्रमाण राखण्यासाठी कामामधून पाणी पिण्यासाठी सुट्टी घ्या.

 

स्त्रोत : Mayoclinic.com

अंतिम सुधारित : 6/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate