डीहायड्रेशन याची व्याख्या शरीरातून अतिप्रमाणात पाण्याचा –हास होणे अशी करता येईल. आपल्या शरीरांना कार्य करण्यासाठी दैनंदिन तत्वावर ठराविक प्रमाणात द्रवपदार्थ घेणे आवश्यक असते, त्याचे किमान प्रमाण हे 8 पेलेभरुन (एक लिटर) इतके असते. कार्यं आणि वयानुसार ही गरज वेगवेगळी असते, परंतु सर्वात क्रियाशील लोकांना या प्रमाणाच्या दोन ते तीनपट पाणी हवे असते. मूलभूत प्रमाणात द्रवपदार्थ घेणे हे आपली सामान्य शारीरिक कार्ये करण्यासाठी लागणारे द्रवपदार्थ भरुन काढण्यास आवश्यक असते. आपण जर कमी प्रमाणात द्रवपदार्थ घेतले किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात ते गमावले तर त्याचा परिणाम डीहायड्रेशनमधे होतो.
पोटातील आंतड्याचा दाह झाला किंवा त्याला नुकसान झाल्यास किंवा विषाणू किंवा जंतू हे आंतड्याच्या आतल्या स्तराला ते शोषून घेईल त्यापेक्षा अधिक द्रवपदार्थ तयार करायला भाग पाडतात त्यावेळी अन्न नलिकेतून मोठ्या प्रमाणात द्रवपदार्थ वाया जातात. मळमळणे किंवा भूक कमी लागणे ही कारणंसुध्दा तोंडावाटे कमी प्रमाणात द्रवपदार्थ घेतले जाण्याला कारणीभूत ठरतात.
काही दिवसांतच (किंवा काहीवेळा तासांमधेच) वजन झपाट्यानं कमी होणं हे डीहायड्रेशन सूचित करणारं खात्रीशीर लक्षण आहे. 10 टक्क्यांहून अधिक प्रमाणात वजन जलदगतीनं कमी होणं हे तीव्र समजलं जातं. मूळ आजाराच्या तुलनेत लक्षणं निश्चित करणं अवघड राहतील, परंतु साधारणतः डीहायड्रेशनची पुढील लक्षणे सांगता येतीलः तहान वाढणे, तोंडाला कोरड पडणे, अशक्तपणा किंवा डोकं हलकं वाटणे (विशेषतः उभे राहिल्यावर आणखी त्रास होणे), लघवीचा रंग गडद होणे, किंवा लघवीचं प्रमाण कमी होणे. तीव्र डीहायड्रेशनमुळं शरीराच्या रासायनिक रचनेत बदल होऊ शकतात, मूत्रपिंड निकामी होऊ शकतं, आणि स्थिती जीवाला घातकही बनू शकते.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 6/8/2020
या वर्षीच्या कमी पावसामुळे सिंचनासाठी पाण्याची उपल...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
दूरदर्शन सह्याद्री निर्मित उपलब्ध पाण्याचा कार्यक्...
वाशिम जिल्ह्यातील सुदी (ता. मालेगाव) हे सुमारे दीड...