अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ होण्याचे प्रमाण वाढणे किंवा ही दोन्ही लक्षणे. हा एक संसर्गजन्य आजार आहे.
असांसर्गिक कुष्ठरोगात तात्पुरते दोन तीन चट्टे किंवा एखादी नस सुजणे एवढेच घडते.
अॅडिसन रोग : (बाह्यकज-प्रवर्तक-न्यूनता). अधिवृक्काच्या [→ अधिवृक्क ग्रंथि] बाह्यकात (बाह्य स्तरात) उत्पन्न होणाऱ्या प्रवर्तकाचे (रक्तात मिसळणाऱ्या उत्तेजक स्रावाचे) न्यूनत्व अथवा अभाव झाल्यामुळे उत्पन्न होणाऱ्या रोगाला ‘अॅडिसन रोग’ असे म्हणतात.
काही आजार एकेकटे येतात, तर काही साथींच्या स्वरूपात. साथ म्हणजे एकावेळी अनेकांना आजार.
समाजात ताप, जुलाब, हगवण हे आजार अधूनमधून होतातच. गावात कोणा ना कोणाला ह्यांपैकी आजार रोजच चालू असतीलच. मग साथ कशाला म्हणायचे.
एंथ्रेक्स हा रोग बॅसिलस अन्थ्रासीस नावाच्या जिवाणु मुळे होतो. एक संसर्गजन्य रोग
एच१एन१ विषाणूने जगभरात घबराट पसरवलेली आहे. या विषाणूची लक्षणे साध्या फ्ल्यूसारखीच असतात. हा एक संसर्गजन्य आजार आहे.
कांजण्या ' हा ' व्हॉरिसेल्ला झोस्टर ' या विषाणूंपासून मोठ्या प्रमाणावर होणारा संसर्गजन्य रोग आहे . हा रोग प्रामुख्याने १० वर्षांखालील मुलांना होतो .
एक दीर्घकालीन संसर्गजन्य रोग. या रोगामुळे प्रामुख्याने त्वचा, विशेषकरून नाकातील श्लेष्मल पटल तसेच मेरुरज्जू आणि स्नायूंना जोडणार्या चेता बाधित होतात. रोगाची तीव्रता वाढल्यास डोळे, यकृत, प्लीहा, स्नायू आणि अस्थिमज्जा यांवरही परिणाम होऊ शकतो.
क्षयरोग (टीबी) हा संसर्गजन्य रोग असुन तो मायक्रोबॅक्टरियम ट्यूबरक्युलोसिस या जीवाणुमुळे होतो.
काही संसर्गजन्य रोगांच्या समूहाला गुप्तरोग म्हणतात. दूषित व्यक्तीशी संभोग केल्यामुळे होणाऱ्या या रोगांना रतिरोग असेही म्हणतात.
गोवराचा अत्यंत संसर्गजन्य विषाणू हा खोकला आणि शिंकांव्दारे, निकटचा संपर्क किंवा नाकातील किंवा घशातील संक्रमित द्रावाशी थेट संपर्क झाल्याने पसरतो.
घटसर्प म्हणजे श्वसन मार्ग (फुफ्फुसे), घसा, तोंड किंवा त्वचेवरील जखम यांना प्रभावित करणारे हे संक्रमण आहे.
निरनिराळया पदार्थांच्या आणि वस्तूंच्या जंतुनाशनाच्या अनेक पध्दती आहेत
डांग्या खोकला हा एक जीवाणूव्दारे होणारा संसर्ग असून त्याचा प्रामुख्याने नाक आणि घशावर प्रभाव पडतो. 2 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांच्या श्वसन मार्गावर त्याचा सामान्यतः हल्ला होतो.
दिवसातून तीन किंवा तीन पेक्षा अधिक वेळा पातळ पाण्यासारखे शैाचाला होणे, म्हणजे अतिसार
पीतज्वर हा व्हायरसजन्य तीव्र स्वरुपाचा रोग असून एकदम सुरुवात, थकवा, खूप ताप, तापाच्या मानाने मंद नाडी, कावीळ ही त्याची वैशिष्ट्ये होत.
पोलियो हे संक्रमण संपूर्ण शरीराला प्रभावित करु शकते, नसा आणि स्नायूंना ते जास्त प्रभावित करते.
लहान मुलांच्या क्षयरोगाच्या प्रकारात शरीराचा जंतूंशी प्रथमच संबंध येतो.
रिकेट्सिया वंशाच्या सूक्ष्मजंतूमुळे उद्भवणाऱ्या आणि तीव्र डोकेदुखी, संतत ज्वर, पुरळ, मुग्धभ्रम (विचार व बोलणे असंबद्ध होऊन बरळणे किंवा प्रलापी बनणे) ही प्रमुख लक्षणे असलेल्या संसर्गजन्य रोगाला ‘प्रलापक सन्निपात ज्वर’ किंवा ‘टायफस ज्वर’ म्हणतात.
आपल्या देशात जवळजवळ 99 टक्के लोकांचा वयाच्या विशीपर्यंत क्षयरोगाच्या जंतूंशी संबंध येऊन गेलेला असतो.
हा एक जीवाणूजन्य आजार आहे
मेंदुज्वर हे माणसाच्या मणक्यातील जलाचे व मेंदुला असलेल्या आवरणजलाचे संक्रमण असते. मेंदुज्वर हा साधारणपणे जिवाणू वा विषाणूंच्या संसर्गामुळे होतो.
ट्रिपोनेमा पर्टेन्यू नावाच्या सूक्ष्मजंतूमुळे उद्भवणाऱ्या अरतिज (संभोगाशी संबंधित नसलेला) परंतु सांसर्गिक असलेल्या रोगाला ‘यॉज’ म्हणतात. मूळ आफ्रिकन शब्द ‘यॉ’ असा असून त्याचा अर्थ ‘रासबेरी’ असा आहे.
हा एक दीर्घकालीन आजार आहे. हा आजार एक प्रकारच्या जिवाणूंमुळे होतो.
क्षयरोग हा विशिष्ट सूक्ष्म जंतूमुळे, म्हणजे जिवाणूंमुळे होणारा आजार आहे.
वर्षभर येणा-या रुग्णांच्या नोंदी करीत गेल्यावर वर्षाच्या शेवटी पुष्कळ माहिती जमा होईल. या तक्त्यावरून येणा-या रुग्णात तापाचे किती, खोकल्याचे किती अशी वेगवेगळ्या रुग्णांची आकडेवारी तयार होईल.
रोगप्रतिबंध हे एक अगदी महत्त्वाचे ध्येयधोरण आहे.
लेप्टोस्पायरोसीस हा लेप्टोस्पायरा या रोगजंतुमुळे होणारा आजार आहे. हा आजार पाण्याशी संबंधित आजार
लोहितांग ज्वर : (स्कार्लेट फीव्हर). हा एक तीव्र सांसर्गिक रोग असून ज्वर, घशाचा शोथ (दाहयुक्त सूज) व विशिष्ट पुरळ ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. स्ट्रेप्टोकॉकस या प्रजातीतील सूक्ष्मजंतूंमुळे होणाऱ्या अनेक रोगांत या रोगाचा समावेश होतो.