অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

एच१एन१ लक्षणे व खबरदारी

एच१एन१ विषाणूने जगभरात घबराट पसरवलेली आहे. या विषाणूची लक्षणे साध्या फ्ल्यूसारखीच असतात आणि खालील साध्या गोष्टींचे पालन करून हा फ्ल्यू टाळता येतो:

एच१एन१ ची सामान्य लक्षणे

  1. सर्वसाधारणपणे जास्त पण नेहमीच्या फ्ल्यूसारखा नसणारा ताप, काही केसेसमध्ये नसूही शकतो.
  2. बाहेर न येणारा कफ
  3. चोंदलेले किंवा वाहणारे नाक
  4. बसलेला घसा
  5. अंगदुखी
  6. डोकेदुखी
  7. थंडी भरणे
  8. अत्यंत थकवा येणे
  9. मळमळ/ जुलाब
  10. अधिक गंभीर स्वाईन फ्ल्यूमध्ये न्यूमोनिया आणि श्वसनप्रक्रिया मंदावणे अशी लक्षणे आढळून येऊ शकतात.

एच१एन१ फ्ल्यू रोखण्यासाठी उपाय

जगभरात खळबळ माजविल्यानंतर स्वाईन फ्ल्यू आता भारताच्या सीमेवर येऊन ठेपला आहे आणि त्याने कित्येक बळी घेतले आहेत. मात्र स्वाईन फ्ल्यू हा असा रोग आहे जो काही खबरदारी घेतल्यास रोखता येतो. साथीपासून बचावण्यासाठी खालील पाच सुचना पाळा:

  1. जर तुम्हाला एच१एन१ विषाणूची लागण झाली आहे असे तुम्हाला वाटत असेल तर घरीच रहा आणि शाळा, कार्यालाय अशा सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळा. त्वरीत वैद्यकिय उपचार करा
  2. तुमचे हात सतत धुवत रहा. हात धुण्यासाठी नेहमी ऍण्टीबॅक्टेरिअल साबण वापरा. हात सतत आणि किमान १५ सेकंद धावत्या पाण्याखाली धुवा.
  3. व्यवस्थित झोप घ्या: दर रात्री किमान ८ तासांची व्यवस्थित झोप घ्या. यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहील.
  4. पुरेसे पाणी प्या : तुमच्या शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर टाकण्यासाठी, शरीरात आणि नाकामध्ये पुरेसा ओलावा टिकवण्यासाठी दररोज किमान ८ ते १० ग्लास पाणी प्या.
  5. खोकताना किंवा शिंकताना इतरांना तुमच्यापासुन संसर्ग होऊ नये यासाठी नाकातोंडावर टिश्यूपेपर किंवा रुमाल धरा.
  6. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी तुमचे डोळे, नाक आणि तोंड यांना सतत स्पर्श करणे टाळा.
  7. आजारी माणसाशी किंवा फ्ल्यूची लक्षणे दाखवणा-या व्यक्तीशी दूरुनच संपर्क साधण्याचा प्रयत्न करा.
  8. तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवा : तुमचे शरीर मजबुत ठेवणे, त्याला व्यवस्थित पोषण देणे आणि संसर्गाशी लढण्यास तयर ठेवणे हे फ्ल्यूशी लढण्यासाठी फार महत्त्वाचे आहे. पूर्णधान्ये, विविधरंगी भाज्या आणि जीवनसत्त्वांनी भरपूर फळे खा.
  9. माहिती मिळवत रहा : साथ रोखण्यासाठी सरकार योग्य त्या उपाययोजना करत आहे आणि वेळोवेळी मार्गदर्शक सुचनाही करत आहे. ही माहिती मिळवत रहा आणि शांतपणे प्रत्येक निर्णय घ्या.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate