कुष्ठरोग एका जीवाणु मुळे होतो. हा एक संसर्गजन्य रोग आहे जसा टीबी, डिफ्थीरिया इ. पण हा रोग बरा होऊ शकतो. फक्त उपचार न घेतलेल्या किंवा न घेणा-या व्यक्ति कडून तो पसरतो.
लक्षणे
- कातडीवर रंगहीन डाग पडणे, त्याजागी उन्हाची जाणीव न होणे वा चिमटा घेतल्यास संवेदना न जाणवणे वा बधीरता येऊ लागणे.
- हात व पाय सुन्न पडणे.
- खुप जागी लाल चट्टे पडून तोंडावर, नितंबांवर व शरीराच्या इतर अवयवांवर देखील डाग दिसु लागतात व त्या भागावर सुन्नता येते.
उपाय
कुष्ठ रोग पुर्णपणे बरा होऊ शकतो. जर डॉक्टरने कुष्ठरोग असल्याचे पक्के निदान केले तर खालील प्रमाणे करावे:
- लवकर बरे होण्यासाठी वेडेवाकडे उपचार करणे टाळावेत त्याने इतरांनादेखील लागण होण्याची शक्यता आहे. मल्टी ड्रग थेरेपी (एमडीटी)
- मल्टी ड्रग थेरेपी नियमित घेतल्यास कोणत्याही पातळीवरचा कुष्ठ रोग बरा होऊ शकतो. मल्टी ड्रग थेरेपी ही वेगवेगळ्या गोळ्या व कॅप्सूलच्या एकत्रीकरणाने तयार होते.
- प्रत्येक जिल्ह्यात जास्तीत जास्त सरकारी रुग्णालयांमध्ये, सीएचसी आणि पीएचसींमध्ये, कुष्ठरोग निवारण केंद्रांवर मल्टी ड्रग थेरेपी विनामुल्य उपलब्ध असते.
- मल्टी ड्रग थेरेपी डॉक्टरने सुचवलेल्या काळापर्यंत घ्यावी.
- मल्टी ड्रग थेरेपी घेण्यासाठी रुग्णाने एक वेळ (जसे जेवणानंतर) ठरवुन घ्यावी म्हणजे रुग्ण गोळ्या घेणे विसरणार नाही.
कुष्ठरोगाबद्दल काही चुकीच्या मसजुती
काही लोकांना अजुनही असे वाटते की कुष्ठरोग पिढ्यानढ्या पापी वागणे, दुषित रक्त, चपकीच्या खाण्याच्या सवयी जसे बोंबील खाणे किंवा मागील जन्मीची पापे या कारणांमुळे होतो.
- लोकांची अशीदेखील मसजुत आहे की कुष्ठरोग हा काही विशिष्ट परिवारांमध्येच होतो व रोग्याला हात लावल्याने पसरतो.
- कुष्ठरोगाने कुरुपता येते व कुरुपता आल्यावरच कुष्ठरोगाचे निदान होते.
- कुष्ठरोग बरा होत नाही.
- ज्या परिवारात कुष्ठरोगी असतात त्यांच्या मुलांना हमखास कुष्ठरोग होतो.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 7/13/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.