हा एक जीवाणूव्दारे होणारा संसर्ग असून त्याचा प्रामुख्याने नाक आणि घशावर प्रभाव पडतो. 2 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांच्या श्वसन मार्गावर त्याचा सामान्यतः हल्ला होतो. रुग्ण श्वास घेतो तेव्हा त्याच्या घशातून विशिष्ट आवाज येतो म्हणून ह्या खोकल्यास व्हूपिंग कफ म्हणतात.
बोर्डेटेला पेर्तुसिस नांवाच्या विषाणूमुळे हा रोग होतो. श्वासातून पडणा-या थेंबावाटे हा विषाणू पसरतो, रुग्ण जेव्हा खोकतो किंवा शिंकतो तेव्हा हे थेंब उडतात. नाकातून वाहणा-या पातळ पदार्थाचा स्पर्श झाल्यानेदेखील हा रोग पसरतो.
टप्पा 1 – लक्षणांमधे शिंका, डोळ्यातून पाणी, नाक वाहणे, भूक न लागणे, शक्ती कमी होणे, आणि रात्रीच्या वेळी खोकला यांचा समावेश होतो.
टप्पा 2 – रुग्णाला खोकल्याची न थांबणारी उबळ येते आणि तो श्वास घेतो तेव्हा जोराचा आवाज येतो.
टप्पा 3 – यात रुग्ण बरा होतो, खोकला आता कमी झालेला असतो. हा टप्पा साधारणतः चौथ्या आठवड्यानंतर सुरु होतो.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 7/4/2020
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...