प्रस्तावना
एंथ्रेक्स हा रोग बॅसिलस अन्थ्रासीस नावाच्या जिवाणु मुळे होतो. हा एक संसर्गजन्य आजार आहे.
कोणत्या अवयवांवर अपाय होतो
सामान्यपणे - त्वचा
अगदी क्वचित – श्वसन मार्ग, जठराचा मार्ग
संसर्ग
- त्वचा - सरळ त्वचेच्या छिद्रातून संपर्क, वातावरणात कोण्या जनावराला लागण झालेली असल्यास त्या जनावराला स्पर्श केल्यास किंवा त्या जनावराचे मांस किंवा मटण खाल्यास
- श्वसन मार्ग - हवेच्या मार्गावर जळजळ
- जठराचा मार्ग - कच्चे वा न शिजलेले अन्न सेवन केल्यास किंवा लागण झालेल्या जनावराचे मांस खाल्यास
- संसर्गजन्य- एका व्यक्तिकडून दुस-या व्यक्तिला लागण.
लक्षणे
- त्वचा - त्वचेवर खाज सुटते व तिचे रुपांतर दाणेदार चट्टे पडून जखमेत होते आणि मग ७-१० चट्टयांचा एक डाग पडतो.
- श्वसन मार्ग - थोडा ताप येणे, कणकण, घाम येणे, छातीत जळजळ (श्वसन मार्गाच्या वरची चिन्ह क्वचित आढळतात)
- जठरांत्र संबंधी मार्ग - मळमळ, जळजळ उलट्या आणि पोटात दुखुन ताप येणे, व रक्ती डायरीयात रुपांतर होते.
रोगाचे नियंत्रण
- लक्षणे दिसल्यावर त्वरित डॉक्टरशी संर्पक साधावा.
- न शिजलेले मांस किंवा जनावराचे अवयवाचे सेवन करणे टाळावे.
- जनावरांना व त्यांच्या कामांना हाताळतांना स्वसंरक्षण करणे गरजेचे आहे.
स्त्रोत: पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 7/30/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.