क्षयरोग (टीबी) हा संसर्गजन्य रोग असुन तो मायक्रोबॅक्टरियम ट्यूबरक्युलोसिस या जीवाणुमुळे होतो.
टीबी हा हवेतून पसरतो. टीबी असलेल्या व्यक्तिमुळे दहा किंवा जास्त निरोगी व्यक्तींना प्रतिवर्षी लागण होऊ शकते.
टीबीची सामान्य लक्षणे
ह्युमन इम्यूनो वायरस (एचआयव्ही, एड्सचा विषाणू) मुळे टीबी होण्याची जास्त शक्यता असते. एचआयव्ही असणा-या व्यक्तिला पहिल्यांदा टीबी होतो. एकदा टीबीच्या जिवाणूची लागण झाली की एचआयव्ही असलेल्या व्यक्तिमध्ये टीबी होण्याची शक्यता ६ पटीने वाढते. पण टीबी बरा होऊ शकतो जरी एचआयव्ही झालेला असला तरीही. डॉटस् पद्धतीने टीबीचे उपचार घेतल्यास रुग्णांच्या मृत्यूची व एचआयव्ही होण्याची शक्यता कमी होते.
इतर मुलांपेक्षा काही मुलांमध्ये टीबीची शक्यता जास्त असते. त्यातील मुले म्हणजे :
टीबीची लस बीसीजीमुळे मुलांमध्ये टीबीची शक्यता होते.
सरळ सोपा उपाय, डॉटस् हा टीबीवरचा उपचार साधारणपणे वापरात असतो. टीबीचा उपचार ६ महिन्यांपर्यंत घ्यावा लागतो.
बाह्य-फुफ्फुसाचा क्षयरोग (इएफटीबी) हा फुफ्फुसांच्या बाहेरच्या बाजूने होतो.
बाह्य-फुफ्फुसाचा टीबी हा फुफ्फुसांच्या एखाद्या भागावर सुज आल्याने होतो (लिम्फ नोड), गतिशीलतेत कमतरता (मणका) किंवा तीव्र डोकेदुखी आणि मेंदुचे रोग (टीबी मैनिंजाइटिस) इ. बाह्य-फुफ्फुसाचा टीबी हा कफाने किंवा खोकल्याने सुरु होत नाही कारण हा फुफ्फुसांत होत नाही.
क्षयरोग म्हणजेच टी.बी. हा रोग अनुवंशिक नाही तर संसर्गामुळे होणारा आहे. क्षयरोग कोणालाही होऊ शकतो. गंभीर क्षयरोगाने ग्रस्त कोणीही व्यक्ती जेव्हा तिच्या तोंडावर हात अथवा रुमाल न धरता खोकते किंवा शिंकते तेव्हा थुंकीच्या फवार्याद्वारे (एअरोसोलद्वारे) क्षयरोगास कारणीभूत असणारे जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया बाहेर येतात आणि आसपासच्या व्यक्तीने हा फवारा आत घेतल्यास तिच्या शरीरात प्रवेश करतात
सर्वांत महत्वाचे लक्षण म्हणजे तीन आठवड्यांपेक्षाही जास्त काळ टिकलेला सततचा खोकला आणि त्यासोबत बाहेर टाकला जाणारा खाकरा. ह्याबरोबरच ताप, वजन घटणे, भूक कमी होणे अशीही लक्षणे आढळतात. ह्यांपैकी कोणतेही लक्षण तीन आठवड्यांपेक्षा जास्त टिकल्यास अशा रोग्याने ताबडतोब जवळच्या डॉट्स (DOTS) टी.बी. केंद्रामध्ये किंवा आरोग्य केंद्रामध्ये जाऊन खाकरा (थुंकी) तपासून घ्यावा
क्षयरोगाचे निदान करण्यासाठी सतत तीन दिवस थुंकी तपासणे गरजेचे असते. ही तपासणी दिल्लीच्या राष्ट्रीय क्षयरोग-निदान केंद्रात तसेच देशात अनेक ठिकाणी असलेल्या डॉट्स टी.बी. केंद्रांमध्ये करता येते. अशा केंद्रांतील ही तपासणी पूर्णपणे मोफत असते.
तपासणीसाठी जोरदार खोकला काढून फक्त खाकरा देणे आवश्यक आहे. त्या ऐवजी लाळ दिली जात नाही हे पहा कारण लाळेच्या तपासणीतून क्षयरोगाचे निदान होऊ शकत नाही.
क्षयरोगावरील औषधे नियमितपणे व सांगितल्याप्रमाणे घेतल्यास हा रोग पूर्णपणे बरा होतो. क्षयाच्या रोग्याने किमान ६ महिने सतत औषध घ्यायला हवे. काहींना वर्षभरदेखील औषध घ्यावे लागते. तसेच डॉक्टरांनी सांगितल्यानंतरच औषध बंद करावे हे उत्तम कारण औषधोपचार मध्येच सोडून दिल्यास किंवा अनियमितपणे घेतल्यास हा रोग बरा तर होत नाहीच उलट जीवघेणा ठरू शकतो.
होय. क्षयरोगावरील औषधे नियमितपणे व सांगितल्याप्रमाणे घेतल्यास हा रोग पूर्णपणे बरा होतो.
क्षयरोगाने ग्रस्त कोणीही व्यक्ती जेव्हा तिच्या तोंडावर हात अथवा रुमाल न धरता खोकते, शिंकते किंवा वाटेल तेथे थुंकते तेव्हा ह्या रोगाचा प्रसार होतो. ह्यामुळे रोगग्रस्त व्यक्तीने तोंड झाकून खोकणे किंवा शिंकणे गरजेचे आहे.
तसेच लोकांनी वाटेल तेथे थुंकू नये, त्यासाठी ठेवलेल्या पिकदाण्यांचा वापर करावा. रोग्यांनी घरीदेखील एखाद्या छोट्या खोक्यात थुंकावे व हे खोके झाकून ठेवावे. ही थुंकी किंवा खाकरा फेकून देण्यापूर्वी उकळावा.
क्षयरोगाची लक्षणे दिसल्यास घाबरू नका किंवा हा रोग लपवण्याचा प्रयत्न करू नका. रोग्याने ताबडतोब स्वतःला तपासून घेणे व काळजी घेणे महत्वाचे असते.
क्षयरोगी आपल्या आवडीनिवडीप्रमाणे कोणतेही अन्न घेऊ शकतो, विशिष्ट अन्नाची गरज नसते. अर्थात अशा व्यक्तीने स्वतःच्या शरीरास चालेल व पचेल तेच खावे.
क्षयरोग्याने विडी, सिगारेट, हुक्का, तंबाखू, दारू ह्या गोष्टी टाळाव्या तसेच नशा आणणार्या कोणत्याही पदार्थाचे सेवन करू नये.
हे करावे
हे टाळावे
डॉटस् म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्व्ड् ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. ही क्षयरोगावरील एक सर्वसमावेशक उपचारपद्धती असून जगभरातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांमध्ये क्षयरोगाचे निदान आणि उपचारासाठी वापरतात. हिची पाच मूलतत्त्वे अशी
गेल्या काही वर्षांमध्ये क्षयरोगानेही स्वतःचे स्वरूप बदलले आहे आणि तो प्रतिजैविक प्रकारच्या काही जुन्या पारंपारिक औषधांना घाबरून पळ काढेनासा झाला आहे. अर्थात ह्याचे कारण म्हणजे काही रोग्यांनी अनियमितपणे किंवा अपुर्या स्वरूपात घेतलेली औषधे. मल्टि-ड्रग रेझिस्टंट म्हणजे एमडीआर टीबीवरदेखील उपचार करता येतात मात्र ते नियमितपणे व पूर्णपणे केले पाहिजेत. तसेच ह्या प्रकारच्या क्षयावरची औषधे महागडी आहेत, ती २ वर्षांपेक्षा जास्त काळपर्यंत घ्यावी लागतात आणि एवढे करून रोगावर परिणाम होईलच ह्याची खात्री नसते.
क्षयरोगाची लागण कोणालाही चटकन होऊ शकते मात्र मुळात एचआयव्हीने ग्रस्त असलेल्यांना क्षय होण्याची शक्यता खूपच जास्त असते. एखाद्या व्यक्तीस फक्त क्षय असला तरीदेखील त्याचे जीवाणू शरीरात राहतात आणि त्यांच्यापासूनचा धोका कायम असतो. एचआयव्हीग्रस्त व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी झालेली असल्याने क्षयाच्या जीवाणूंची वाढ तेथे चटकन होते आणि मग त्याचे रुपांतर क्षयरोगात होते.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 8/21/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...