অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

घटसर्प

प्रस्तावना

श्वसन मार्ग (फुफ्फुसे), घसा, तोंड किंवा त्वचेवरील जखम यांना प्रभावित करणारे हे संक्रमण आहे.

कारण

हा रोग कॉरीनीबॅक्टेरीयम डीप्थेरीया या जीवाणूमुळे होतो आणि तो श्लेष्माव्दारे एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीला पसरतो. त्याशिवाय, हा जीवाणू एक विषद्रव्य बनवतो ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंचा दाह होतो किंवा नसांचे नुकसान होते.

लक्षणे

  1. नाकातून वाहाणे
  2. घशात वेदना
  3. ताप
  4. कसेतरी वाटणे

प्रतिबंध

मुलांना घटसर्पा च्या विरोधात डीपीटीची लस द्या.  मुलांच्या लसीकरणाचे वेळापत्रक अधिक तपशीलासाठी पाहा.

घटसर्प हा जीवघेणा रोग असल्यानं एखाद्या मुलाला तो झाल्याची शंका आल्यास तत्काळ एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 6/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate