অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कांजण्या

प्रस्तावना

कांजण्या ' हा ' व्हॉरिसेल्ला झोस्टर ' या विषाणूंपासून मोठ्या प्रमाणावर होणारा संसर्गजन्य रोग आहे . हा रोग प्रामुख्याने १० वर्षांखालील मुलांना होतो . मुलांना लहान वयात कांजण्या आल्या नसतील तर मोठेपणी कांजण्या येण्याची शक्यता असते . कांजण्या येताना आढळल्यास त्वरित उपचार सुरू करावेत जेणेकरून आजाराची तीव्रता आटोक्यात राहील . कांजण्याविरुद्ध लस उपलब्ध आहे . परंतु ती अतिशय महाग आहे .

वैद्यकीय सल्ल्यानुसार जन्मापासून १३ वर्षांपर्यंत कधीही कांजण्या न झालेल्या व्यक्तीस अति तीव्र स्वरूपात कांजण्या होऊ नयेत  म्हणून लसीकरणाचा सल्ला देण्यात येतो . राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात या लसीचा समावेश करण्यात आलेला नाही व कांजण्याचे निर्मूलन वस्तीपातळीवर शक्य नाही .

लक्षणे

पुरळांची वैशिष्ट्ये

  1. लाल, फुगीर फोडाने सुरुवात
  2. ते वाढून त्यात पू होतो, फुटतात आणि पसरतात
  3. सर्वाधिक प्रमाणात चेहरा, टाळू, कंबर इथं होतात.  हात आणि पायांवर कमी प्रमाणात परंतु असतात.
  4. खाज अत्यंत तीव्र असते.
  5. ताप

प्रतिबंध

कांजिण्यावरती आता एक लस उपलब्ध असून ज्याला हा रोग झालेला नाही आणि ज्याच्या शरीरात कांजिण्याचा प्रतिकार करण्यासाठी पुरेसे प्रतिपिंड नाहीत अशा बारा वर्षे वयापेक्षा जास्त वयाची कोणातीही व्यक्ती ती घेऊ शकते.

लक्षात ठेवा

  1. कांजिण्या झालेल्या मुलांना अस्पिरीन दिल्यास रेयज् सिंड्रोम होतो, हा एक तीव्र स्वरुपाचा रोग असून त्यामुळे मेंदूचे नुकसान होऊन मृत्यु होऊ शकतो.  मुलांना कांजिण्या झाल्या असतील तर त्यांनी अस्पिरीन घेऊ नये.  एखाद्या डॉक्टरने लिहून दिल्याखेरीज अन्य रोगांसाठीसुध्दा त्यांनी अस्पिरीन घेऊ नये.  मुलांसाठी कोणती औषधे सुरक्षित आहेत ते कळण्याकरता नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेणे इष्ट.
  2. आणखी गुंतागुंत म्हणून प्रौढांना न्यूमोनिया होण्याची अधिक शक्यता असते.  त्याशिवाय, एचआयव्ही संसर्ग असलेले रुग्ण किंवा प्रतिकारक्षमता कमी असलेल्या रुग्णांना न्यूमोनियाचा आणखी धोका असतो.
  3. ज्या गर्भवतींना याआधी कांजिण्या कधीच झालेल्या नसतील त्यांनी ज्यांच्या शरीरात क्रियाशील विषाणू आहे अशांसोबत संपर्क टाळावा.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 7/31/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate