वनस्पती
अजीवोपजीवीजन्य वनस्पतिरोग : वनस्पतींना होणारे कित्येक रोग जीवोपजीवी म्हणजे दुसऱ्या जीवांवर उपजीविका करणाऱ्या जीवांमुळे होत असतात.
अपाच्छेदन व पानझड : उच्च दर्जाच्या (वाहिनीवंत—द्रव पदार्थ वाहून नेणाऱ्या वाहिन्या असलेल्या) वनस्पतींचे भिन्न भाग आपोआप गळून पडताना आढळतात; या घटनेस ‘अपाच्छेदन’ व ठराविक ऋतुमानात पाने गळून पडतात त्यास ‘पानझड’ म्हणतात.
(लॅ. यूपॅटोरियम ओडोरॅटम; कुल - कंपॉझिटी). सु. २५–३० सेंमी. उंचीचे वेलीसारखे चढणारे हे क्षुप (झुडूप) पश्चिम वेस्ट इंडीज बेटे, दक्षिण अमेरिका, आसाम, बंगाल इ. ठिकाणी आढळते.
१०–१५ मी. उंचीचा हा सदापर्णी वृक्ष भारतात सर्वत्र विशेषतः नद्या व ओढे यांच्या काठाने, पाणथळ जागी व समुद्रकिनाऱ्याजवळ आढळतो.
जमिनीवर पसरणारी किंवा वर चढणारी ही वेल विशेषेकरून जंगलात आढळते.
०–६० सेंमी. उंचीची ही शोभिवंत वनस्पती मूळची मेक्सिकोतील (म. अमेरिका) असून हल्ली सर्वत्र बागेत लावलेली आढळते.
(इं. ब्राझील इपेकॅक; लॅ.सेफीलिस (सायकोट्रिया) इपेकॅक्युन्हा; कुल रुबिएसी). हे एका उपयुक्त औषधाचे व्यापारी नाव असून ते मूळच्या ब्राझीलमधील लहान, बहुवर्षायू ओषधीय वनस्पतीपासून काढतात.
फुलझाडांपैकी एकदलिकित वनस्पतींतील लिलिएलीझ (लिलिफ्लोरी) गणात ह्या कुलाचा अंतर्भाव केला जातो. यामध्ये सु. ६० वंश व १,५०० जाती आहेत.
ह्या वृक्षांना संयुक्त द्विदली पाने असून, दले लंबगोल, चिवट व लहान असतात; फुले पांढरी, परिमंजरीवर येतात.
कठिण लाकडासाठी प्रसिद्ध असणारा हा वृक्ष काँब्रेटेसी कुलातील आहे. याचे शास्त्रीय नाव टर्मिनॅलिया टोमेंटोजा असे आहे.
आवृतबीज वनस्पतींपैकी [ वनस्पति, आवृतबीजी उपविभाग] द्विदलिकित या वर्गातील मिर्टेलीझ (मिर्टिफ्लोरी) गणात या कुलाचा अंतर्भाव केलेला आहे.
ऑफिओग्लॉसेलीझ : (अहिजिव्ह-गण; इं. अडर्स टंग अँड मूनवर्ट फर्नस). नेचे वर्गातील एक प्रारंभिक गण. यात ऑफिओग्लॉसेसी हे एकच कुल असून त्यामध्ये फक्त ३ वंश (ऑफिओग्लॉसम, बॉट्रिकियम व हेल्मिंथोस्टॅकिस) व सु. ८० जाती आहेत.
फुलझाडांपैकी एकदलिकित वर्गातील ह्या गणामध्ये ऑर्किडेसी, बर्मानिएसी व अॅपोस्टॅसिएसी या तीन कुलांचा अंतर्भाव केला आहे.
फुलझाडांपैकी ऑर्किडेलीझ या गणातील एक कुल. बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणाऱ्या) अपिवनस्पती, जमिनीवर नेहमी आढळणाऱ्या, क्वचित शवोपजीवी (मृत शरीरावर जगणाऱ्या) अशा ओषधी ह्या कुलात समाविष्ट आहेत (४५० वंश व सु. १५,००० जाती).
फॅगेसी कुलातील सदाहरित तसेच पानझडी वृक्ष. हा वृक्ष मूळचा पश्चिम आशियामधील असून भारतात तो हिमालयाच्या पर्वतीय भागात आढळतो.
बहुतेक सर्व परिचित वनस्पतींतील हिरवा रंग (हरितद्रव्य) ज्यांमध्ये आढळत नाही अशा इतर सर्व अबीजी वनस्पतींना पूर्वी ‘कवक’ म्हणत असत.
काटेरी इंद्रायण या नावाने भारतीय बाजारात तिची कोवळी, सुकी फळे मिळतात. काकडी, कडू इंद्रायण व कलिंगड यांसारख्यांची काही लक्षणे या वनस्पतीत आढळतात
कापूर हे सुंगधी, वेदनाहारक, पूतिरोधक आणि कामोत्तेजक आहे. अनेक औषधांमध्ये आणि नायट्रोसेल्युलोज संयुगे तयार करण्यासाठी त्याचा वापर करतात. मेंथॉलाप्रमाणे ते त्वचेच्या संपर्कात आल्यास थंडगारपणा जाणवतो.
निसर्गात अशा काही वनस्पती आहेत की, ज्यांना पोषणाकरीता कीटकासारख्या भक्ष्याची आवश्यकता भासते. अशा वनस्पतींना नायट्रोजनयुक्त पदार्थ आणि लवणे जमीन, पाणी किंवा वातावरणातून जरी मिळत असले तरी ते गरजेपक्षा कमी पडतात.
भूक वाढविणारे औषध
सु. ६ मी. उंचीचा हा वृक्ष कोकणात, उंच घाटावर व उत्तर कारवारात सामान्यत: दाट जंगलात आढळतो.
ही सरळ वाढणारी वर्षायू (एक वर्ष जगणारी) ओषधी भारतात सर्वत्र तणासारखी उगवलेली आढळते; शिवाय ही श्रीलंका, अफगाणिस्तान,चीन इ. देशांतही आढळते.
अलीकडे भारतात आणि इतर उष्ण व उपोष्ण कटिबंधांतील प्रदेशांत हिची लागवड केली जाते.ही जमिनीसरपट वाढते,तसेच आधारामुळे उंचीवरही पसरते.
फुलझाडांपैकी अॅपोसायनेसी कुलामध्ये कुडा या नावाखाली पुढे वर्णन केलेल्या तीन निरनिराळ्या वनस्पतींचा समावेश होतो.
या नाजूक जलवनस्पतीचा प्रसार उष्णकटिबंधात व भारतात सर्वत्र (तळी, डबकी, खंदक इ. जलाशयांत) असून हिचे मुलक्षोड (जमिनीतील खोड) जाड व क्षितिजसमांतर वाढते.
कुमुद : (हिं. बाराचुली; लॅ. लिम्नॅथिमम इंडिकम; कुल-जेन्शिएनेसी). या नाजूक जलवनस्पतीचा प्रसार उष्णकटिबंधात व भारतात सर्वत्र (तळी, डबकी, खंदक इ. जलाशयांत) असून हिचे मुलक्षोड (जमिनीतील खोड) जाड व क्षितिजसमांतर वाढते.
बागेत शोभेकरिता लावलेली व सामान्यपणे आढळणारी ही आवृतकंदयुक्त (कंदावर आवरण असलेली) ओषधी मूलतः दक्षिण अमेरिकेतील असून हिचा प्रसार रानटी अवस्थेतही भारतात सर्वत्र आहे.
अफगाणिस्तान, सिंध, उ. आफ्रिका व भारत (पंजाब व गंगेच्या वरच्या खोऱ्यात) सामान्यतः आढळणारे हे मरुवासी क्षुप (झुडूप) कंपाझिटी कुलातील असल्याने त्याची शारीरिक लक्षणे साधारणपणे त्यात वर्णिल्याप्रमाणे आहेत.
या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शोभेच्या वनस्पतींच्या पॅसिफ्लोरा वंशात एकूण सु. २४ जाती असून त्या सर्व मूळच्या दक्षिण अमेरिकेतील आहेत व आता इतर उष्ण व उपोष्ण कटिबंधांतील देशांत बागांतून लावलेल्या आढळतात.