অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुमुद

कुमुद

कुमुद

(हिं. बाराचुली; लॅ. लिम्नॅथिमम इंडिकम; कुल-जेन्शिएनेसी). या नाजूक जलवनस्पतीचा प्रसार उष्णकटिबंधात व भारतात सर्वत्र (तळी, डबकी, खंदक इ. जलाशयांत) असून हिचे मुलक्षोड (जमिनीतील खोड) जाड व क्षितिजसमांतर वाढते. खोड पाण्यात तरंगते व लांब असते; त्यापासून देठासारख्या फांद्या व त्यांच्या पेऱ्यापासून मुळे, फुलांचा घोस व एक तरंगणारे जाड पान येते. ते सु. ३० सेंमी. व्यासाचे, वर्तुळाकृती किंवा हृदयाकृती असते. फुले पांढरी व त्याचा मध्य पिवळा असून ती एप्रिल—सप्टेंबरमध्ये येतात. शाकीय अभिवृद्धी (बीजांशिवाय वनस्पतीचे इतर अवयव लावून केलेली लागवड) कळ्या व आगंतुक मुळांपासून किंवा मूलक्षोडापासून होते. मूलक्षोड, मुळे, फांद्या व पानांचे देठ यांचा भाजीसाठी उपयोग करतात. वनस्पती कडू असून स्कर्व्हीनाशक (आहारात क जीवनसत्त्व कमी पडल्यामुळे निर्माण होणारी स्थिती नाहीशी करणारी) व ज्वरनाशक आहे. शोभेकरीता तळ्यात व लहान पुष्करणीत लावतात. या वनस्पतीचा समावेश हल्ली निफॉयडिस या वंशात मेनिअँथेसी कुलात केला जातो.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate