অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुरासन्ना

कुरासन्ना

(हिं. रासना; सं. रास्ना; लॅ. प्लुचिया लॅन्सिओलॅटा,  कुल-कंपॉझिटी). अफगाणिस्तान, सिंध, उ. आफ्रिका व भारत (पंजाब व गंगेच्या वरच्या खोऱ्यात) सामान्यतः आढळणारे हे मरुवासी क्षुप (झुडूप) कंपाझिटी कुलातील असल्याने त्याची शारीरिक लक्षणे साधारणपणे त्यात वर्णिल्याप्रमाणे आहेत. खोड ०·३–१ मी. उंच व फांद्या बारीक, लवदार; पाने अखंड २–६ सेंमी. लांब, बिनदेठाची, चिवट, लोमश (लवदार) आयताकृती. गुलुच्छातील जांभळट स्तबकात [ पुष्पबंध] बाहेरील स्त्री-पुष्पके फलनक्षम, आतील द्विलींगी, वंध्य व थोडी असतात; पिच्छसंदले खाली जुळलेली असतात [ फूल]; स्तबके डिसेंबरात येतात.पाने सौम्य रेचक असून सोनामुखीऐवजी वापरतात. रब्बी पिकात हे त्रासदायक तणाप्रमाणे वाढते. या वनस्पतीत पौष्टिक गुणधर्म अधिक आहेत, तथापि हिची कडवट चव व दुर्गंध यांमुळे भुस्सा किंवा ज्वारीच्या धाटांबरोबर मिसळल्याशिवाय गुरे खात नाहीत.

लेखक : सिंधु अ.पराडकर

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate