অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुंगीण

कुंगीण

(मेडसिंग; इं. प्रिवेट; लॅ. लिगुस्ट्रम निलवेरेन्स ; कुल-ओलिएसी). सु. ६ मी. उंचीचा हा वृक्ष कोकणात, उंच घाटावर व उत्तर कारवारात सामान्यत: दाट जंगलात आढळतो. साल पातळ, करडी पांढरी असून फांद्यांवर वल्करंध्रे (सालीतील छिद्रे) जडवल्यासारखी असतात. पाने आखूड देठाची, अंडाकृती पण लांबट, लघुकोनी  किंवा निमुळत्या टोकाची, चिवट व अखंड; पुष्कळ, पांढरी, सुगंधी फुले फांद्यांच्या टोकास संमिश्र फुलोऱ्यावर ऑगस्ट–नोव्हेंबरमध्ये येतात. फळ काळे, वाटाण्याएवढे असून जानेवारीत पिकते; त्यावर भुरकट आवरण दिसते. याचे लाकूड पांढरे व चमकदार, सुबक, घन, मध्यम कठीण व टिकाऊ असून झोपड्यांकरिता व सरपणाकरिता वापरतात.

लेखक : ज.वि.जमदाडे

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate