आसामलोटा : (लॅ. यूपॅटोरियम ओडोरॅटम; कुल - कंपॉझिटी). सु. २५–३० सेंमी. उंचीचे वेलीसारखे चढणारे हे क्षुप (झुडूप) पश्चिम वेस्ट इंडीज बेटे, दक्षिण अमेरिका, आसाम, बंगाल इ. ठिकाणी आढळते. पाने केसाळ, लंबगोल, २–१२ सेंमी. दंतुर; स्तबक [ पुष्पबंध] पांढरे किंवा निळे, छदमंडल लांब किंवा आखूड, छदे थोडी बाहेरची लहान, पुष्पासन अनावृत्त, पुष्पमुकुट सर्व सारखे, नलिकाकृती फूल]; फळे (संकृत्स्न) छेदित, पंचकोनी; केसांसारखी संदले एकाच वर्तुळात पण अनेक [ कंपॉझिटी]. हे आसामात व बंगालमध्ये तणासारखे वाढते. हे मत्स्यविष आहे. बागेत वाफ्याच्या कडेने शोभेकरिता लावतात.
अयापान टी :(लॅ. यूपॅटोरियम अयापाना). या नावाची आसामलोट्याच्या वंशातील एक लहान बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ⇨ओषधी बागेत लावतात; फुले करडी-निळी असतात. पाने कडवट असून काढा रक्तस्रावरोधक आहे. वनस्पतीचा फांट उत्तेजक, पौष्टिक व स्वेदक (घाम आणणारा); सुक्या पानांचा व प्ररोहांचा (कोंबांचा) पाण्यातील अर्क हृदयक्रियेस उत्तेजक; मळ साफ करणे व जखमा धुणे ह्यांकरिता वनस्पतीचा काढा व पानांचा रस फिलिपीन्समध्ये वापरतात.
लेखक : सिंधू अ. पराडकर,
अंतिम सुधारित : 1/30/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.