অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुमूर

कुमूर

(लॅ. पॅँक्रॅशियम ट्रायफ्लोरम;  कुल-अ‍ॅमारिलिडेसी) बागेत शोभेकरिता लावलेली व सामान्यपणे आढळणारी ही आवृतकंदयुक्त (कंदावर आवरण असलेली)  ओषधी  मूलतः दक्षिण अमेरिकेतील असून हिचा प्रसार रानटी अवस्थेतही भारतात सर्वत्र आहे. उबदार हवा व मोकळी भुसभुशीत जमीन हिला मानवते. पाने लांबट, अरुंद, मूलज (मुळापासून निघालीत अशी वाटणारी) व पातळ (२०-४५ X १·५-५ सेंमी.) असून चवरीसारखा फुलोरा १५–२० सेंमी. उंच व बारीक दांड्यावर मे-जूनमध्ये येतो व त्यावर पांढरी सुगंधी फुले तीन ते आठपर्यंत असतात. परिदल-नलिका ३–५ सेंमी. लांब व कंठ फुगीर असून तेथेच केसरतंतूमध्ये तळाजवळ पापुद्र्याचा पेला (केसरतोरण)  असतो; किंजपुट अधःस्थ व तीन कप्प्यांचा असून बीजके अनेक [ फूल ] व बोंड त्रिधारी, गोलसर असते. औषधी उपयोग जंगली कांद्याप्रमाणे. पँक्रॅशियम कॅरिबियम (गार्डन लिली) ही दुसरी जातीही बागेत विशेषेकरून लावलेली आढळते.

लेखक :अहिल्या पां. जगताप

स्त्रोत : मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 3/11/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate