अन्नातून विषारी द्रव्ये शरीरात गेली असता जी विकृती उत्पन्न होते तिला अन्नविषबाधा म्हणतात. विषाणू जीवाणू, आदिजीव असे सूक्ष्मजीव व परजीवी यांचा संसर्ग तसेच रासायनिक पदार्थांचे सेवन यांमुळे जठर आणि आतड्याचा दाह होतो
अमिबिक यकृत फोड हा आंतड्यातील परजीवी एन्टामिबा हिस्टोलिटीका याच्यामुळे यकृतात झालेला पू होय.
वैयक्तिक स्वच्छतेमध्ये नखांची निगा राखणे महत्वाचे असते. कारण नखात अडकलेली घाण पोटात जाऊन वेवेगळ्या प्रकारचे पोटाचे आजार होऊ शकतात.
काही जणांच्या पायावरच्या नीला (शिरा) सुजलेल्या दिसतात.
मेंदूला रक्तपुरवठा करणार्या एखाद्या धमनीमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे पक्षाघात होतो
ज्या विकृतीत रक्तप्रवाहात पूयजनक सूक्ष्मजंतूंचा शिरकाव होऊन त्यांचे पुंजके, दूषित अंतर्कील किंवा संक्रामित अंकुर रक्तप्रवाहातून वाहताना छोट्या रक्तवाहिनीत अडकतात व त्या जागी नंतर ⇨ विद्रधी (पूमय गळू) उत्पन्न करतात, त्या विकृतीला ‘पूयरक्तता’ म्हणतात.
पोट साफ होण्यासाठी आहारामध्ये पालेभाज्या, कोंडा यांचे प्रमाण चांगले पाहिजे. रोज पोटपूर्ण साफ होणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे.
फुफ्फुसांच्या आजाराने त्रासलेले लक्षावधी नवे रुग्ण दरवर्षी आढळतात, ज्या व्यक्तींच्या आजाराबद्दल माहिती नाही अशांची संख्या वेगळीच. फुफ्फुसांच्या आजाराची विशिष्ट लक्षणे असतात
मधुमेह याचा अर्थ लघवीत साखर असणे. सर्वसाधारणपणे उपाशीपोटी 100 मि.ली. रक्तामध्ये साखरेचे प्रमाण 80-120 मि.ग्रॅ. इतके असते.
मधुमेह हा बहुधा मांजराच्या पावलांनी येणारा आजार आहे. त्याचे शरीरावर गंभीर परिणाम व्हायच्या आधी तो ओळखून नियंत्रण ठेवणे आवश्यक असते.
रक्तातील साखर वाढल्यावर सामान्यपणे लघवीतही साखर उतरते.
मुतखडा : मूत्रोत्सर्जक तंत्रात (संस्थेत) तयार होणाऱ्या अश्मरीला मुतखडा म्हणतात. मुतखडा अनेक कारणांमुळे उद्भवत असला, तरी तो ज्या प्रमुख पदार्थाचा बनतो त्याचे मूत्रातील अती सांद्रण (अतिशय प्रमाण वाढणे) हे प्रमुख कारण असते.
मूतखडा म्हणजे एक कडक वस्तुमान असून ते सूक्ष्म कणांनी बनलेले असते. मूत्रपिंडात किंवा मूत्रमार्गात एकाचवेळी एक किंवा अनेक खडे असू शकतात.
मूळव्याध : गुदद्वार, गुदमार्ग व गुदांत्राचा खालचा २ ते ३ सेंमी. लांबीचा भाग [⟶ गुदद्वार व गुदांत्र] यांच्याशी संबंधित उपकलास्तराच्या खाली असलेल्या नीलांच्या जाळ्यातून सुरू होणाऱ्या नीलांच्या अपस्फीतीला (विस्फारणे, गाठाळणे व पीळ पडणे) ‘मूळव्याध’ किंवा ‘अर्श’ म्हणतात.
गंभीर मुत्रमार्गाच्या विफलतेत सामान्यतः मृत्राशयाचे मुत्र विसर्जन, मल विसर्जन आणि इलेक्ट्रोलाइट्स संरक्षण निकामी होणे हे दिसुन येते.
यकृताच्या ज्या चिरकारी (दीर्घकालीन) विकृतीत यकृत कोशिकांचा (पेशींचा)नाश, तंत्वात्मकता व पुनर्जनित ऊतकाच्या (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहाच्या) गाठीएकाच वेळी यकृतात आढळतात .
यकृताच्या दाहयुक्त सूज येण्याला ‘यकृतशोथ’ म्हणतात. या दाहयुक्त सुजेस अनेक कारणे असूशकतात व कारणपरत्वे रोगाचे अनेक प्रकारही ओळखले जातात.
सूत्रण हा जीर्ण यकृत रोगाचा परिणाम असून त्यात यकृतावर व्रण पडतात आणि त्याचे कार्य बिघडते.
हृदयाचे आजार व रक्तवाहिन्यांचे आजार थोडे वेगवेगळे असतात.
आपल्या शरीरात सर्वत्र रक्तवाहिन्यांचे सूक्ष्म जाळे पसरलेले असते.
विषरक्तता : रक्तामध्ये विद्राव्य (विरघळलेल्या) रूपात विषारी पदार्थ प्रविष्ट होऊन त्यांच्या अभिसरणामुळे शरीरातील विविध इंद्रियांमध्ये हानिकारक परिणाम घडून येण्याच्या स्थितीस विषरक्तता म्हणतात.
मानसिक आनंद, कैफ, कामवासना वगैरे गोष्टींसाठी अफूचा मोठया प्रमाणावर वापर केला जातो. हळूहळू याचे व्यसन लागते. खूप जास्त डोस दिला गेला तर मृत्यू येऊ शकतो.
गांजाचा परिणाम मेंदू, चेतातंतू, पचनसंस्था, मूत्रजननसंस्था, स्त्री-पुरुष जननसंस्था,रक्त, श्वसनसंस्था वगैरे अनेक जागी होतो.
निकोटीन हे तंबाखूतले रसायन अत्यंत विषारी आहे. ते लाळेतून, श्वासातून रक्तात मिसळते.
सर्व दारूंमध्ये एथिल अल्कोहोल (मद्यार्क) कमी अधिक प्रमाणात असते. यात अनेक प्रकार आहेत.
वैद्यकीय दृष्टिकोनातून व्यसनाधीनतेच्या चार पाय-या आहेत
व्यसन म्हणजे कोठल्या तरी मादक, उत्तेजक पदार्थाची सवय. याचे सगळयांत मोठे उदाहरण म्हणजे दारू.
व्यसनमुक्ती हे त्या व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी मोठेच आव्हान असतेआणि चिकाटीने प्रयत्न केला तरच यात यश येऊ शकते.
नुसते अंगावरून पाणी घेणे म्हणजे आंघोळ होत नाही. रोज स्वच्छ पाण्याने व साबणाने अंग चोळून आंघोळ करावी. केसांची निगा चांगली राहावी म्हणून निदान आठवडयातून एकदा तरी केस धुवावेत.
शरीराला प्रत्येक अवयव कोणत्या ना कोणत्या प्रकारे एक दुसऱ्याशी जोडलेला असतो. एखादया अवयवात बिघाड झाला की त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होऊन आरोग्य/ तब्येत बिघडते.