काही जणांच्या पायावरच्या नीला (शिरा) सुजलेल्या दिसतात. निरोगी अवस्थेत नीला फुगल्या तर सरळ असतात. नीलांमध्ये रक्त वर चढत जाण्यासाठी झडपा असतात. झडपा निकामी झाल्या, की रक्त वर चढत नाही. रक्त पायांमध्ये साठून राहते आणि नीलांना सूज आणि वळणे येतात. ज्यांना सतत उभे राहून काम करावे लागते (उदा. चौकातला वाहतूक पोलीस) अशांना हा आजार होण्याची जास्त शक्यता असते. नीलावृध्दीच्या पहिल्या अवस्थेत पाय जडावणे, मंद दुखणे, इत्यादी लक्षणे दिसतात. नंतर रक्त साकळून जखमा तयार होतात व या जखमा लवकर ब-या होत नाहीत. नीलावृध्दी हा चिवट आजार आहे. पहिल्या अवस्थेत उपचार केले तर तो आटोक्यात राहू शकतो. आर्सेनिकम कल्केरिया कार्ब फेरम फॉस लॅके सिसपल्सेटिला सिलिशिया सल्फर
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 6/29/2020
या विभागात १ वर्षाच्या पुढील सर्वांसाठी उपयुक्त ...
मान व उदर यांच्या मधील धडाच्या भागास छाती म्हणतात....
हृदयाचे आजार व रक्तवाहिन्यांचे आजार थोडे वेगवेगळे ...