शारीरिक आजार होण्याची कारणे
प्रस्तावना
शरीराला प्रत्येक अवयव कोणत्या ना कोणत्या प्रकारे एक दुसऱ्याशी जोडलेला असतो. एखादया अवयवात बिघाड झाला की त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होऊन आरोग्य/ तब्येत बिघडते. उदा. जेव्हा सर्दी होते तेव्हा ते खरं म्हणजे नाक व छातीचे दुखणे असते पण त्यावेळी डोकं सुद्धा दुखतच असते.
जेव्हा जुलाब होतात तेव्हा शरीरातील पाणी कमी होतेच व त्यामुळे अशक्तपणाही खूप वाटतो.
आजाराची इतर कारणे
- मानसिक ताण / टेन्शन जर सतत जाणवत असेल तर ब्लडप्रेशरचा त्रास आणि त्यापासून हार्टअटाकसुद्धा येण्याची शक्यता असते. तसेच मधुमेह / डायबेटीस सारखा आजारही होऊ शकतो.
- एकाच जागी बसून राहिले किंवा हातापायांची पुरेशी हालचाल न झाल्यामुळे किंवा आयुष्यभर बैठे काम केल्यामुळे काही रोग शकतात.
- सिगरेट, बिड्या, तंबाखू, गुटखा खाणे, दारू पिणे यामुळे कॅन्सर सारखे रोग होऊ शकतात.
- हवेच्या प्रदूषणामुळे दम्यासारखा आजार होऊ शकतो.
जंतूपासून होणारे आजार
वातावरणातील बदलांमुळे अनेक वेगवेगळ्या जंतूची वाढ होते. हे जंतू माणसाच्या शरीरामध्ये श्वासातून, पाण्यातून, अन्नातून, स्पर्शातून गेले तर त्यांची त्या माणसाच्या शरीरात वाढ होऊ लागते आणि माणसाला आजार किंवा रोग होतो. उदा.
- पावसाळ्यात साठलेल्या पाण्यात डासांची वाढ होते आणि डास चावाल्यामुळे हिवताप / मलेरियाचा आजार होतो.
- विहिरीतले किंवा नदीतले पाणी स्वच्छ / शुद्ध न करता प्यायल्यास उलटया, जुलाब , हगवण, कावीळ व विषमज्वर यासारखे आजार होतात.
- उघड्यावरचे माशा बसलेले अन्न किंवा आंबलेले, शिळे अन्न खाल्ल्यामुळे पटकीचा (कॉलरा) आजार होऊ शकतो.
- ज्या माणसाला खरुज झालेली आहे अशा माणसाच्या स्पर्शातून दुसऱ्या माणसालाही खरुज होऊ शकते.
- टी.बी. झालेल्या माणसाच्या थुंकीतून, खोकल्याद्वारे टी.बी. चे जंतू हवेतून इतरांच्या शरीरात जाऊ शकतात आणि टी.बी. चा आजार होऊ शकतो.
इतर आजार
- सर्दी-पडसे - सर्दी-पडसे ही अगदी नेहमी दिसून येणारी आणि कोणालाही होणारा आजार आहे. हवामान बदलले की सर्दी-पडशाचा त्रास होतो. सर्दी ही जंतूमुळे होते. सर्दी एकपासून दुसऱ्याला होऊ शकते. सर्दी झाली की माणसाला बारीक ताप येणे, नाक चोंदणे, डोकं जड होणे व दुखणे आणि डोळ्यांतून पाणी येणे अशा तक्रारी सुरु होतात. सर्दी झाली की आणखीन ही काही आजार उदभवू शकतात, ते म्हणजे कानदुखी, घशाला सूज, श्वास घेताना त्रास इत्यादी.
- खोकला – घशापासून ते फुफ्फुसातल्या श्वासनलिकेपर्यंत काहीही आजार झाला की खोकला येण्याची शक्यता असते. खोकला म्हणजे श्वास घेण्यात अडथळा येत असलेले पदार्थ बाहेर टाकण्याचा शरीराचा प्रयत्न आहे. खरेतर खोकला हे विविध रोगांचं एक लक्षण आहे असे समजावे. खोकला जर लवकर बारा झाला नाही तर त्यावर वेळीच डॉक्टरांकडून योग्य ते उपचार घ्यावेत.
- घसा सुजणे – यांत आवाज बदलतो आणि घसा आतून लाल होतो व सुजतो. तसेच कोरडा खोकला व गिळायला त्रास व ताप ही लक्षणे दिसतात.
- दमा – हा सुद्धा श्वसनाचा आजार आहे. यात मुख्यत: श्वास घ्यायला त्रास होतो व कोरडा खोकला, बेडकायुक्त खोकला, ताप अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात.
- ताप – ताप हे वेगवेगळ्या रोगांचे लक्षण आहे. मलेरिया, डेंग्यु, न्युमोनिया अशा प्रकारच्या रोगांमध्ये ताप असतोच.
स्त्रोत : आरोग्य म्हणजे काय ? माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 6/6/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.