प्रस्तावना
मूतखडा म्हणजे एक कडक वस्तुमान असून ते सूक्ष्म कणांनी बनलेले असते. मूत्रपिंडात किंवा मूत्रमार्गात एकाचवेळी एक किंवा अनेक खडे असू शकतात.
पर्यायी नांवे
रीनल कॅलक्युली, नेफ्रोलिथियासिस, मूतखडे
कारणे
मूतखडा होण्याची महत्वाची कारणे
- बियाणेयुक्त भाज्या आणि फळे खाल्याने.
- शरीरात कॅल्शियमची मात्र अधिक झाल्याने.
- जंक फूड खाल्याने.
- पाणी कमी प्यायल्यामुळे .
आपल्या लघवीत ठराविक पदार्थांचे प्रमाण खूप वाढल्यास मूतखडे होतात. हे पदार्थ लहान कण तयार करतात जे नंतर खडे बनतात. मूतखडे जेव्हा मूत्रमार्गातून खाली येत नाहीत तोवर त्यांची लक्षणे कळत नाहीत, यावेळी वेदना होते. ही वेदना सामान्यतः तीव्र असते आणि ती ओटीपोटाच्या खालच्या भागात सुरु होते आणि नंतर इंद्रियापाशी पोचते.
मूतखडे ही सामान्य बाब आहे. अंदाज 5 टक्के स्त्रिया आणि 10 टक्के पुरुषांना ते सत्तर वर्षांचे होईतोवर किमान एकतरी मूतखडा होतो. ज्या व्यक्तीला एकदा मूतखडा झाला आहे त्याला ते पुन्हा होतात. लवकर जन्मलेल्या बाळांमधे मूतखडे सहज सापडतात.
खड्यांचे प्रकार
- कॅल्शियमचे खडे सर्वात सामान्य आहेत. ते पुरुषांमधे दोन किंवा तीन पटीने सामान्य आहेत, जे वयाच्या वीस किंवा तिसाव्या वर्षी सापडतात. ते पुन्हा होण्याची शक्यता असते. कॅल्शियम हे ऑक्झलेट, (सर्वात सामान्य पदार्थ), फॉस्फेट किंवा कार्बोनेटसारख्या इतर पदार्थांसोबत मिळून खडे तयार करते. काही अन्नामधे ऑक्झलेट असते. लहान आतड्याच्या रोगांमुळं ऑक्झलेट खडे तयार करण्याची प्रवृत्ती वाढते.
- युरीक आम्लाचे खडे सुध्दा पुरुषांमधे सामान्य आहेत. ते गाऊट किंवा केमोथेरपीशी निगडीत आहेत. युरीक आम्लाचे खडे सर्व खड्यांमधे अंदाजे 10 टक्के असतात.
- सिस्टीन्युरीया असलेल्या लोकांमधे सिस्टाईन खडे तयार होतात. ही एक अनुवांशिक व्याधी असून पुरुष तसंच महिलांना देखील होते.
- स्ट्रुव्हाईट खडे हे मूत्रमार्गाच्या संक्रमणामुळे प्रामुख्याने स्त्रियांमधेच सापडतात. ते खूप मोठे होतात आणि मूत्रपिंड, मूत्रमार्ग किंवा मूत्राशयाला बाधा निर्माण करतात.
- अन्य पदार्थ स्फटीक बनून, गाळीव बनतात आणि त्यांचे खडे होतात.
लक्षणे
- ओटीपोटाच्या खाली किंवा पाठीत वेदना
- एका किंवा दोन्ही बाजूला वेदना
- वाढत जाणारी
- तीव्र
- आखडल्यासारखी
- ही वेदना गुप्तांगाच्या भागात सरकून पसरते
- मळमळणे, उलट्या
- वारंवार लघवी होणे । घाईची लागणे, वाढणे (सारखे लघवीला जावेसे वाटणे)
- लघवीमधे रक्त
- ओटीपोटात वेदना
- वेदनेसह लघवी होणे
- लघवीत अडथळा येणे
- वृषण दुखणे
- लिंग दुखणे
- ताप
- थंडी
- असामान्य लघवीचा रंग
तपासणी आणि चाचण्या
वेदना इतकी तीव्र असू शकते की वेदनाशामक द्यावे लागतात. ओटीपोट किंवा पाठीला स्पर्श केल्यास नाजूक वाटते. खडे मोठे, सतत होणारे किंवा वारंवार होणारे असतील तर मूत्रपिंड निकामी झाल्याचे ते लक्षण असेल.
- लघवी गाळून घेतल्यास खडे काढले जातील तेव्हा मूत्रमार्गातील खडे पकडता येतात.
- खड्याचे विश्लेषण केल्यास त्याचा प्रकार कळून येतो.
- लघवीचे विश्लेषण केल्यास त्यात खडे आणि लाल रक्तपेशी दिसतात.
- युरीक आम्ल वाढलेले दिसते
मूत्रमार्गातील खडे किंवा अवरोध यात दिसून येतोः
- मूत्रपिंडाचे अल्ट्रासाऊन्ड
- आयव्हीपी (इंट्राव्हेनस पायलोग्राम)
- ओटीपोटाची क्ष-किरण तपासणी
- रेट्रोग्रेड पायलोग्राम
- ओटीपोटाचा सीटी स्कॅन
- ओटीपोटाची । मूत्रपिंडाची एमआरआय
चाचण्यांमधून रक्त किंवा मूत्रातील कॅल्शियमची उच्च पातळी दिसून येते.
- मूत्रमार्गाचे संक्रमण
- मूत्रवाहीनीत अडथळा, तीव्र एकमार्गीय बाधाकारक युरोपॅथी
- मूत्रपिंडाचे नुकसान, व्रण होणे
- संक्रमित मूत्रपिंडाचे कार्य कमी होणे किंवा संपणे
प्रतिबंध
मूतखडे होण्याचा इतिहास असेल, तर पुरेशा प्रमाणात विद्राव्य लघवी तयार होण्यासाठी द्रवपदार्थ घ्यावेत (दर दिवशी 6 ते 8 ग्लास पाणी). खड्याच्या प्रकारानुसार, ते पुन्हा होऊ नयेत यासाठी औषधे आणि अन्य उपायांची शिफारस करण्यात यावी.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम