অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मृत्राशयाची दीर्घकालीन विफलता

व्याख्या

गंभीर मुत्रमार्गाच्या विफलतेत सामान्यतः मृत्राशयाचे मुत्र विसर्जन, मल विसर्जन आणि इलेक्ट्रोलाइट्स संरक्षण निकामी होणे हे दिसुन येते.

इतर काही नावे

मृत्राशय निकामी होणे - गंभीर;

मुत्र थांबणे - गंभीर;

मुत्र विसर्जन कमी होणे- गंभीर;

सीआरएफ; मृत्राशयाचे काम पुर्णपणे बंद होणे

कारणे

तीव्र मुत्र विसर्जन विफलता, मुत्र विसर्जन अचानकपणे बंद होणे वा किडनीचे काम बंद होणे, कमी होणे यामुळे गंभीर स्वरूप धारण करुन मृत्राशय पुर्णपणे निकामी होऊ शकते. हे थोड्या प्रमाणात सुरु होऊन गंभीरतेत परिवर्तीत होऊ शकते  व वाढत वाढत शेवटी एंड-स्टेज रेनल रोगात रुपांतरीत होऊ शकते (इएसआरडी).

तीव्र मुत्र विसर्जन विफलतेत शरीरातील घाण व मुत्र शरीरात साठु लागते ज्याने अझोटेमिया आणि युरेमिया होतो. अझोटेमिया हा रक्तातील नायट्रोजन मल साठल्यामुळे होतो. त्याची काही लक्षणे नाहीत. युरेमियामध्ये मुत्रमार्ग निकामी झाल्याने ताप येऊ लागतो. शरीराच्या सर्व संस्थावर मुत्र विसर्जन निकामी झाल्यास परिणाम होतो. शरीरीत पाणी आणि युरेमिया साठुन राहिल्याने बरेच त्रास उद्धभवु शकतात.

लक्षणे

प्राथमिक स्थरावर खालील काही लक्षणे पहायला मिळतात :

  1. वजनात असाधारण घट
  2. मळमळ, उलट्या
  3. साधारण तापासारखे वाटणे
  4. थकवा
  5. डोकेदुखी
  6. सारख्या उचक्या लागणे
  7. साधारण खाज

नंतर खालील काही लक्षणे सुरु होतात :

  1. लघवी होण्याचे प्रमाण फार वाढणे किंवा फार कमी होणे
  2. रात्री लघवीस लागणे
  3. जखमा होणे किंवा रक्त जाणे
  4. उलटीत किंवा मलात रक्त पडणे
  5. सजागता कमी होणे
  6. थकवा, तंद्री लागणे वा सुस्ती येणे
  7. भ्रमप्रलाप होणे
  8. कोमा
  9. स्नायुंमध्ये घट्टपणा किंवा जकड येणे
  10. मिरगी येणे, फिट येणे
  11. पांढरा घाम – घामाद्वारे कातडीतून पांढरा पापूद्रा तयार होणे
  12. हात, पाय व इतर भाग अस्वच्छ वाटणे

या रोगावर अतिरिक्त लक्षणे खालील प्रमाणे आहेत :

  1. रात्री सारखे लघवीला जावेसे वाटणे
  2. सारखी तहान लागणे
  3. अचानक पणे कातडी पांढरी किंवा काळी वाटणे
  4. रुक्षपणा
  5. नखात दोष दिसू लागणे
  6. श्वासाला वास येणे
  7. उच्च रक्तदाब

परिक्षण आणि त्यावरच्या काही चिकित्सा

रक्तदाब उच्च किंवा कमी असु शकतो. मेंदुपरिक्षणात पॉलीन्यूरोपॅथी दिसू शकते. स्टेथास्कोपने परिक्षण केल्यास हदयाचा व फुफ्फुसांचा अनियमित आवाज ऐकु येतो. मुत्रपरिक्षणात प्रोटीन व इतर काही घटकांचे अंश दिसुन येतात. प्रत्येक ६ ते १० महिन्यात मुत्रपरिक्षणाचे वेगवेगळे निकाल दिसुन येतात.

  1. क्रिएटिनाईनची पातळी वाढत जाते.
  2. बीयूएन मध्ये क्रमिक वृद्धी दिसू लागते
  3. क्रिएटिनाईनचे परिक्षण नितळ येत नाही
  4. पोटॅशियमचे प्रमाण वाढवले दिसते.
  5. धमनी रक्त गॅस आणि रक्त रासायनिक विश्लेषणात वेगवेगळे अँसिडोसायसिस दाखवते.

मृत्राशय निकामी होण्याच्या संकेतांमध्ये दोन्ही किडन्यांचा देखील समावेश येतो. यात किडनीचा आकार सामान्य पेक्षा कमी होतो. तो खालीलप्रमाणे पाहिला जाऊ शकतो :

  1. ओटीपोटाचा किंवा मृत्राशयाचा एक्स-रे काढून
  2. ओटीपोटाचे सीटी स्कॅन करुन
  3. ओटीपोटाचे एमआरआय
  4. ओटीपोटाचे अल्ट्रासाऊंड

ह्या रोगामुळे खालील परिक्षणांचे निकालदेखील फरकाने येऊ शकतात :

  1. मूत्र निर्मोक
  2. मूत्र स्कॅन
  3. पीटीएच
  4. सिरम मॅग्नेशियम परिक्षण
  5. एरिथ्रोप्रोटीन
  6. मुंगी त्वचा संक्रमण

वैद्यकिय सल्ला केव्हा घ्यावा

  1. जर मळमळ किंवा उलट्या २ आठवड्यापेक्षा जास्त राहिल्यातर त्वरित वैद्यकिय सल्ला घेऊन उपचार सुरु करावे.
  2. मुत्र निसर्जन कमी किंवा वाढीव असेल तर किंवा इतर काही लक्षणे दिसू लागल्यास त्वरित वैद्यकिय सल्ला घ्यावा.

बचाव

वर दिलेल्या लक्षणांवर उपचार घेतले तर पुढील आजार टळेल व पुर्णपणे किडनी निकामी होण्याचे वाचेल. डायबाटीस असणा-यांनी साखरेवर आणि रक्त दाबावर नियंत्रण ठेवावे व धुम्रपान टाळावे.

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 7/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate