अंकाई-टंकाई : नासिक जिल्ह्याच्या येवले तालुक्यातील ऐतहासिक स्थान मनमाडच्या दक्षिणेस १४ किमी. दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर आणि येवला-मालेगाव रस्त्यावर अंकाई (अनकाई) गाव आहे. गावाजवळ अंकाई-टंकाई किल्ले आहेत.
अकोला जिल्हा : महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील जिल्हा. उ. अक्षांश १९°५१ ते २१°१६' व पू. रेखांश ७६° ३८' ते ७७° ४४'. क्षेत्रफळ १०,५९६ चौ. किमी.; लोकसंख्या १५,००,४६८ (१९७१). याच्या पश्चिमेस बुलढाणा, उत्तरेस अमरावती, पूर्वेस अमरावती व यवतमाळ आणि दक्षिणेस परभणी व यवतमाळ जिल्हे आहेत.
अकोला हा विदर्भातील जिल्हा आहे. निजामशाहीच्या काळात हैद्राबाद संस्थानमध्ये समाविष्ट असणारे अकोला हे शहर ब्रिटिश काळात-१९व्या शतकात- बेरार प्रांतात आले.
अकोला शहर : अकोला जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,६८,४५४ (१९७१). मोर्णेच्या पश्चिम तीरावर जुना गाव व पूर्व तीरावर ताजनापेठ ही नवीन वस्ती मिळून अकोल्याचे क्षेत्रफळ १६·४ चौ. किमी. आहे.
महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई, भंडारदरा धरण, निळवंडे धरण आणि प्रवरा नदी हे येथील प्रमुख वैशिष्ट्य आहे.
अक्कलकोट संस्थान : ब्रिटिश अंमलाखालील भारतातील सु. ५०० चौ. किमी. क्षेत्राचे एक मांडलिक संस्थान. अक्कलकोट संस्थान सोलापूर जिल्ह्यात सोलापूरच्या आग्नेयीस होते. हे संस्थान दुय्यम प्रतीचे असल्यामुळे त्यास तोफेच्या सलामीचा मान नव्हता.
अचलपूर : अमरावती जिल्ह्यातील तालुक्याचे शहर. लोकसंख्या ४२,३३३; कँप २४,०८९ (१९७१). वऱ्हाडची ही एकेकाळची भरभराटलेली राजधानी. तिचे पूर्वीचे नाव एलिचपूर. सातव्या शतकातल्या ताम्रपटात याचा निर्देश सापडतो.
अजिंठा : महाराष्ट्रातील प्राचीन शैलगृहे व भित्तिचित्रे यांचे एक जगप्रसिद्ध स्थळ. अजिंठा हा गाव लेण्यांजवळ ६ किमी. च्या आत डोंगरमाथ्यावर असल्यामुळे इंग्रज लेखकांच्या लेखांत यांचा उल्लेख ‘अजिंठ्याची लेणी’ असा असला, तरी तेथील स्थानिक लोक त्यांचा उल्लेख ‘फर्दापूरची लेणी’ असाच करतात.
अन्नमलई : सह्याद्रीचा दक्षिणेकडील फाटा. पालघाट खिंडीनंतर सह्याद्रीची एक रांग दक्षिणेकडे सुरू होते. तिलाच ‘दक्षिणघाट’ म्हणतात. या दक्षिणघाटाच्या अनाईमुडी शिखरापासून ईशान्येला पलनी, दक्षिणेला एलामई ऊर्फ कार्डंमम व उत्तरेला अन्नमलई नावाच्या पर्वतश्रेणी पसरल्या आहेत.
अमरावती हा महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील एक जिल्हा आहे
प्राचीन इतिहासात अमरावती शहराचा उल्लेख महाभारतात आढळतो.
कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील औद्योगिक शहर. लोकसंख्या ८७,७३१ (१९७१). हे कोल्हापूरपासून सडकेने २३ किमी.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या ३०,६४७ (१९७१).
नागपूर जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या २७,०९२ (१९७१).
उस्मानाबाद जिल्हा राज्याच्या दक्षिण भागात स्थित आहे. जिल्ह्याचा बहुतांश भाग खडकाळ तर उर्वरित भाग सपाट आहे.
परभणी जिल्ह्याच्या हिंगोली तालुक्यातील तीर्थक्षेत्र. लोकसंख्या ४,२७६ (१९६१). हे बालाघाट पर्वतराजीच्या कुशीत हिंगोलीच्या नैर्ऋत्येस १९ किमी. आहे.
सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थल. लोकसंख्या ४,९७४ (१९७१). हे सातारा शहराच्या आग्नेयीस ४२ किमी. वसलेले असून पंतप्रतिनिधींच्या भूतपूर्व जहागिरीची राजधानी होती.
सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील दत्ताचे एक प्रसिद्ध क्षेत्र.
औरंगाबाद जिल्हा : महाराष्ट्राच्या मराठवाडा विभागातील जिल्हा. उत्तर अक्षांश १९०१८' ते २००४०' व पूर्व रेखांश ७४०४०' ते ७६०४०'. क्षेत्रफळ १६,७१८.२ चौ. किमी.; लोकसंख्या १९,७१,००६ (१९७१). या जिल्ह्याच्या उत्तरेस जळगाव, पूर्वेस बुलढाणा व परभणी, दक्षिणेस बीड व अहमदनगर आणि पश्चिमेस अहमदनगर व नासिक हे जिल्हे येतात. जिल्ह्याचे जास्तीत जास्त दक्षिणोत्तर अंतर १६१ किमी. व पूर्व - पश्चिम अंतर २०१ किमी. आहे.
औरंगाबाद शहर : महाराष्ट्रातील जिल्ह्याचे व मराठवाडा विभागाचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या कँटोनमेंटसह १,६५,२५३ (१९७१). गोदावरीची उपनदी खाम हिच्या उजव्या तीरावर हे वसले असून मनमाड - हैदराबाद मीटरमापी लोहमार्गावरील स्थानक आहे. हे पुण्याच्या २३० किमी. आणि अहमदनगरच्या १०९ किमी. ईशान्येस असून मोटारवाहतुकीचे केंद्र आहे. येथून नऊ किमी.वर चिकलठाणा येथे विमानतळ आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या १३,४७७ (१९७१).
कराड : (कऱ्हाड, करहाट). सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ४२,३२९ (१९७१). याच्या वायव्येस ९ किमी. वसंतगड, ईशान्येस ६ किमी. सदाशिवगड आणि आग्नेयीस ६ किमी. आगाशिव डोंगर असून हे कृष्णा-कोयना संगमाजवळ, पुणे-बंगलोर हमरस्त्यावर, दक्षिण-मध्य रेल्वेमार्गावर व कोकणाशी दळणवळणाच्या दृष्टीने मोक्याच्या ठिकाणी वसले आहे.
कारेन भाषा : कारेन ही ध् तिंबेटो-ब्रह्मी भाषासमूहातील ब्रह्मदेशाच्या दक्षिण भागात बोलली जाणारी भाषा आहे. तिच्या भाषिकांना `ख्या' हे नाव असून तिचे महत्वाचे केंद्र उत्तरेकडे कारेन्नी हे आहे. ख्रि.पू. पाचव्या शतकात तिबेटो-ब्रह्मी टोळयांची एक `लाट मॉड्:ख्मेरव्याप्त भागात उतरली असावी.
कार्ले : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील प्राचीन बौद्ध लेण्यांचे सुप्रसिद्ध स्थळ. ही लेणी पुणे-मुंबई रस्त्यांवरील मळवली रेल्वे स्नकापासून उत्तरेस सु.पाच किमी. वर एका डोंगरात खोदलेली आहेत. येथील बौद्ध भिक्षूंच्या अनेक विहारांवरुन त्यास विहारगाव असेही म्हणतात
कावेरी : दक्षिण भारतातील प्रमुख व पवित्र नदी. लांबी ७६० किमी. जलवाहन क्षेत्र सु.९४,४०० चौ.किमी. कर्नाटक राज्याच्या कूर्ग जिल्ह्यातील ब्रह्मगिरी डोंगरावर १,४२५ मी. उंचीवर उगम पावून ती सामान्यतः आग्नेयीकडे वाहते. परंतु तिच्या प्रवाहाची दिशा अनेक वेळा एकदम बदललेली दिसते.
कुलाबा जिल्हा : महाराष्ट्राचा पश्चिम सरहद्दीवरील अरबी समुद्राला भिडलेला कोकण भागातील जिल्हा. १७० ५२' उ. ते १९० ३' उ. व ७३० २' पू. ते ७३० ७' पू.; क्षेत्रफळ ७,०२४ चौ. किमी. लोकसंख्या १२,६१,१५६ (१९७१). याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस खाडीपलीकडे बृहन्मुंबई, उत्तरेस ठाणे, पूर्वेस पुणे, आग्नेयीस सातारा व दक्षिणेस रत्नागिरी जिल्हा आहे.
कोकण : भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील अरुंद किनारी प्रदेशाचा मुख्यतः महाराष्ट्रातील भाग. महाराष्ट्रातील याचे क्षेत्रफळ ३०,४०० चौ. किमी. व लोकसंख्या एकट्या बृहन्मुंबईची ५९,७०,५७५ धरून १,०४,९३,३२३ (१९७१) आहे. पूर्वीच्या अनेक उल्लेखांप्रमाणे उत्तरेकडे दमणगंगा व दक्षिणेकडे काळी नदी असा याचा विस्तार मानला, तर दमणचे क्षेत्र ७० चौ. किमी.
राज्याचे मुख्य असलेले कोल्हापूर शहर प्राचीन शहर आहे.हे शहर पंचगंगा नदीच्या तीरावर वसले आहे, तिला 'दक्षिणकाशी' असे म्हणून संबोदले जाते.
कोल्हापूर शहर : करवीर. दक्षिण महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र, जिल्ह्याचे ठिकाण आणि जुन्या कोल्हापूर संस्थानची राजधानी. लोकसंख्या गांधीनगर या उपनगरासह २,६७,५१३ (१९७१). हे पंचगंगेच्या दक्षिण तीरावर, पुणे-बंगलोर महामार्गावर पुण्यापासून २३२ किमी. असून रुंदमापी लोहमार्गाने ते मुंबईशी जोडलेले आहे.
गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर-पूर्व दिशेला वसलेला आहे. हा जिल्हा १८.४३' ते २१.५०' उत्तर अक्षांश आणि ७९.४५' ते ८०.५३' पूर्व रेखांश या दरम्यान मोडतो