অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अंकाई-टंकाई

अंकाई-टंकाई

अंकाई टंकाई

नासिक जिल्ह्याच्या येवले तालुक्यातील ऐतहासिक स्थान मनमाडच्या दक्षिणेस १४ किमी. दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर आणि येवला-मालेगाव रस्त्यावर अंकाई (अनकाई) गाव आहे.

गावाजवळ अंकाई-टंकाई किल्ले आहेत. पायथ्यापासून सु. ३२८ मी. उंच असलेल्या टेकडीचा माथा १६ किमी. परिघाचा आणि अवघड कड्यांचा असून त्यावर अंकाई किल्ला आहे. सात तटांच्या बिकट वाटेतून वर जावे लागते. टंकाईच्या बांधणी भांडागारपद्धतीची आहे.

शहाजहानचा सेनापती खानखानानने १६३५ मध्ये आलकापालका व अंकाई - टंकाई घेतल्याचा उल्लेख मिळतो. दक्षिणेकडील गोदावरीचे खोरे व उत्तरेकडील गिरणेचे खोरे, खानदेश या मूलखांवर नजर ठेवण्यासाठी अंकाई-टंकाई उपयुक्त असत. अंकाईवर तीन मंदिरे आणि ब्राह्मणी लेणी असून टंकाईच्या दक्षिण बाजूस सात जैन लेणी आहेत. अप्रतिम कोरीव काम असलेली ही लेणी सध्या भग्नावस्थेत आहेत.

 

शाह, र. रू.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate