অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कावेरी

कावेरी

दक्षिण भारतातील प्रमुख व पवित्र नदी. लांबी ७६० किमी. जलवाहन क्षेत्र सु.९४,४०० चौ.किमी. कर्नाटक राज्याच्या कूर्ग जिल्ह्यातील ब्रह्मगिरी डोंगरावर १,४२५ मी. उंचीवर उगम पावून ती सामान्यतः आग्नेयीकडे वाहते. परंतु तिच्या प्रवाहाची दिशा अनेक वेळा एकदम बदललेली दिसते.

ती प्रथम पूर्वेस, मग काहीशी ईशान्येसनंतर आग्नेयीसमेत्तूर जलाशयापूर्वी कर्नाटक-तमिळनाडू सीमेवर नैर्ऋत्येसजलाशयानंतर तमिळनाडूच्या कोईमतूर व सेलम जिल्ह्यांच्या सीमेवरुन थेट दक्षिणेसभवानी ते श्रीरंगम्‌ पुन्हा आग्नेयीस व त्यानंतर पूर्वेस वाहत जाते. श्रीरंगम्‌पासून एक फाटा कॉलेरुन नावाने ईशान्येकडे जाऊन चिदंबरम्‌च्या दक्षिणेकडून बंगालच्या उपसागराला मिळतो. दुसरा फाटा तंजावरवरुन जाऊन नागापट्टणम्‌जवळ समुद्रास मिळतो. हा फाटा कावेरीच्या सुपीक व समृद्ध त्रिभुज प्रदेशातील कालव्यांना पाणी पुरवितो.

सुरुवातीच्या ब्रह्मगिरी ते कुशलनगर टप्प्यात कावेरी डोंगरातून कोरुन काढेल्यानागमोडीदाट वनस्पतीयुक्त व उंच उंच कडांच्या दरीतून येते. नंतर ती कर्नाटक पठाराच्या सु.३५ किमी. रुंद व १,००० मी. उंचीच्या मलनाड भागातून पुढे पठाराच्या `मैदानभागातून जाते. ती अत्यंत खडकाळ भागातून वाहते.

त्यात ग्रॅनाइट खडक विशेषतः आढळतो. तिच्या मार्गात अनेक द्रुतवाह व धबधबे तयार झाले आहेत. घ्त्यांत चंचनकट्टी येथील प्रपात अत्यंत मनोवेधक आहे. त्यानंतर नदी सु.३००-४०० मी. रुंद होऊन तिच्यात श्रीरंगपटण हे पहिले बेट तयार झाले आहे. त्याचे आधी म्हैसूरपासून सु.१८ किमी. अंतरावर या नदीला धरण बांधून कृष्णराजसागर नावाचा जलाशय तयार केला आहे. तेथेच वृंदावर नावाचे सुरम्य विश्रामस्थान उभारलेले आहे.

पुढे शिवसमुद्रम्‌ येथेही प्रवाहाचे दोन भाग होऊन मध्ये बेट तयार झालेले आहे. पश्चिमेकडील प्रवाहाला गगनचुक्की व पूर्वेकडील प्रवाहाला भारचुक्की म्हणतात. येथे कावेरी सु.१०० मी. खोल उडी घेते. त्याचा फायदा घेऊन १९०२ पासून येथे वीजनिर्मिती केली जाते. ही वीज शेतीलाकोलार येथील सोन्याच्या खाणींना आणि बंगलोरम्हैसूर व कोलार शहरांना पुरविली जाते. कर्नाटक राज्यात कावेरीला अनेक बांध घालून तिचे पाणी शेतीला पुरविलेले आहे. सेलम जिल्ह्यात मेत्तूर येथे कावेरीला १९३८मध्ये प्रचंड धरण बांधले असून तेथे मोठया कावेरीवरील शिवसमुद्रम्‌ धबधबा प्रमाणात वीज उत्पन्न केली जाते व कालव्यांनी शेतीला पाणी पुरविले जाते.

नंतर एरोडवरुन श्रीरंगम्‌ येथे आल्यावर पुन्हा नदीत बेट तयार झालेले आहे. जवळच तिरुचिरापल्ली हे प्रसिद्ध शहर आहे. येथून कावेरीला संपन्न त्रिभुजप्रदेश सुरु होतो. कर्नाटक राज्यात कावेरीला ककब्बेसुवर्णवतीहेमावतीशिम्शा,कर्णावलीकब्बनी इ. उपनद्या मिळतात आणि तमिळनाडू राज्यात भवानीनोयिलअमरावती या मिळतात.

कावेरी कर्नाटक व तमिळनाडू या दोन्ही राज्यांतून वाहत असल्यामुळे आणि दोन्ही राज्यांना तिच्यापासून जलविद्युत्‌ आणि शेतीसाठी भरपूर पाणीपुरवठा हवा असल्यामुळे या राज्यांत `कावेरी पाणी तंटाउपस्थित झाला आहे. केंद्र सरकारचे धोरण पसंत नसल्यामुळे तमिळनाडू शासनाची सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेण्यापर्यंत मजल गेली आहे आणि आपले म्हणणे एकून घेतल्याखेरीज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय करु नयेअशी कर्नाटक शासनाची भूमिका आहे.

कावेरीवरील शिवसमुद्रम् धबधबा

कावेरीच्या काठचा सर्वच प्रदेश अत्यंत नयनरम्य आहे. कालवे काढून या नदीचा उपयोग शेतीसाठी करण्याची कल्पना पहिल्या शतकातील चोल राजांपासूनची आहे. अकराव्या शतकात बांधलेला ग्रॅंड अ‍ॅनिकट हा कालवा व सतराव्या शतकात चिक्कदेव राजाने बांधलेली तीन धरणे आजही चालू आहेत. तंजावरचा प्रदेश तर दक्षिण भारतातील बगीचा म्हणून प्रसिद्ध आहे. कावेरीकाठच्या प्रदेशात भातनारळकेळीतंबाखूऊसभुईमूगकापूसमिरचीतेलबियाकॉफीवेलदोडेकाजूमिरीचंदनइमारती लाकूडरेशीम,हिरे-माणकेमॅंगॅनीज लोखंड इ. अनेकविध उत्पन्ने होतात. कावेरीला दक्षिण गंगाच म्हणतात. कावेरीच्या काठची श्रीरंगपट्टण,श्रीरंगम्‌कुंभकोणम्‌तंजावरतिरुवैय्यरकावेरीपटनम्‌ इ. तीर्थक्षेत्रे शेकडो वर्षे प्रसिद्ध आहेत.

समृद्ध शेतीसुंदर नगरेउंच उंच गोपुरे,प्रत्येक देवळाजवळचे बांधीवरम्य तलाव यांनी कावेरीचा परिसर गजबजलेला आहे. कावेरीच्या उगमाजवळ दरवर्षी श्रावण महिन्यात मोठी यात्रा भरते. गंगहोयसळचोल इ. राजे व टिपू सुलतान वगैरेंच्या काळातील ऐतिहासिक आणि पुराणवस्तुविषयक अवशेषही कावेरीकाठच्या भागात आढळतात.

ब्रह्मगिरीवर अपत्यप्राप्तीसाठी तप करणाऱ्या कवेर मुनीला ब्रह्मदेवाने आपल्याला विष्णूकडून मिळालेली लोपामुद्रा ही कन्या दिली. कवेराची कन्या म्हणून तिला कावेरी नाव मिळाले. तिने तप करुन लोकोपकारार्थ नदीरुप मिळविलेअशी स्कंदपुराणात कथा आहे. क्षणभरही आपल्याला सोडून कोठे जाता कामा नयेया अटीवर कावेरीने अगस्ती ऋषीशी विवाह केलापरंतु ती अट मोडल्यामुळे तिने नदीरुप घेतले. मग त्याच्या विनवणीवरुन ती नदी व लोपामुद्रा या दोन्ही 3पांनी राहिलीअशी व अगस्तींनीच कावेरीचा प्रवाह उत्पन्न केला अशीही आख्यायिका आहे.


कुमठेकरज.ब.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate