उस्मानाबाद जिल्हा राज्याच्या दक्षिण भागात स्थित आहे. जिल्ह्याचा बहुतांश भाग खडकाळ तर उर्वरित भाग सपाट आहे. समुद्र सपाटीपासून जिल्ह्याची उंची ६०० mm इतकी आहे. जिल्ह्याचा बहुतांश भाग बालाघाट नावाच्या लहान पर्वताने व्यापलेला आहे. भूम, वाशी, कळंब, उस्मानाबाद आणि तुळजापूर हे तालुके बालाघाटच्या रांगेत स्थित आहेत. गोदावरी आणि भीमा सारख्या मोठ्या नद्यांचा काही भाग जिल्ह्याच्या अंतर्गत येतो.
उस्मानाबाद जिल्हा मराठवाडा विभागाच्या पूर्व बाजूला उत्तरेस १७.३५ ते १८.४० डिग्री अक्षांश आणि पूर्वेस ७५.१६ ते ७६.४० डिग्री अक्षांश मध्ये स्थित आहे.
उस्मानाबाद जिल्हा खालील जिल्ह्यांनी व्यापलेला आहे.:
सोलापूर - दक्षिण-पश्चिम अहमदनगर - उत्तर-पश्चिम बीड - उत्तर लातूर - पूर्व बिदर & गुलबर्गा (कर्नाटक) - दक्षिण |
||
जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२.४ चौ.किमी आहे पैकी शहरी भागाचे क्षेत्रफळ २४१.४ चौ.किमी आहे(एकूण क्षेत्रफळाच्या ३.२१ %) आणि ग्रामीण भागाचे क्षेत्रफळ ७२७१.० चौ.किमी आहे (एकूण क्षेत्रफळाच्या ९६.७९ %).
उस्मानाबाद जिल्ह्याचे वातावरण साधारणपणे कोरडे असते. पावसाळ्याचे वातावरण हे जुन महिन्याच्या मध्यापासून सुरु होऊन सप्टेबरच्या शेवटी संपते.ऑक्टोबर पासून नोव्हेंबर पर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबरच्या मध्यापासून ते जानेवारी पर्यंत हिवाळा असतो. फेब्रुवारी पासून ते मार्च पर्यंत वातावरण कोरडे असते. एप्रिल पासून ते जून पर्यंत उन्हाळा असतो. मराठवाड्यातील दुसऱ्या जिल्ह्यांच्या तुलनेत उस्मानाबाद जिल्ह्यामधील उन्हाळ्यातील तापमान कमी असते.
या जिल्ह्यातील सरासरी पाऊस ७६५.५ mm इतका असतो. परंतु वर्ष २०११-२०१२ मध्ये सरासरी पाऊस ३८७.४ mm इतका रेकॉर्ड केला होता. (म्हणजेच ५०.५%). २०१०-२०१२ मध्ये रेकॉर्ड केलेला सर्वाधिक(कमाल) पाऊस ९५१.१ mm तर सर्वात कमी(किमान) पाऊस ३८७.४ mm इतका होता. सर्व तहसिलपैकी भूम, परंडा, वाशी आणि कळंब हे डी पी ए म्हणून घोषित केले आहेत.
स्त्रोत : http://osmanabad.nic.in/
अंतिम सुधारित : 8/6/2020
उस्मानाबाद येथे हजरत शमशुद्दीन गाझी यांचा दर्गा प्...