उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या ३०,६४७ (१९७१). हे दक्षिणमध्य रेल्वेवर, परळी वैजनाथपासून ९६ किमी. आग्नेयीस असून जिल्ह्यातील महत्त्वाच्या शहरांशी सडकांनी जोडलेले आहे. येथील किल्ल्यात उदागीर बुवांची समाधी तसेच शहाजहान व औरंगजेब यांचे उल्लेख असलेले शिलालेख आहेत. जिल्ह्यातील ही एक महत्त्वाची बाजारपेठ असून येथील गुरांचा व उंटांचा बाजार प्रसिद्ध आहे. येथे देवणी जातीच्या बैलांचे विकासकेंद्र, कृत्रिम रेतनकेंद्र, मेंढीपालनकेंद्र तसेच गुरांचा दवाखाना आहे. उदगीरच्या कांबळी प्रसिद्ध असून सरकारने येथे बिदरी व हातमाग ह्यांची शिक्षणकेंद्रे काढलेली आहेत. ३ फेब्रुवारी १७६० रोजी उदगीरजवळ मराठ्यांनी मोगलांचा पराभव केला होता. ही लढाई उदगीरची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे.
लेखक :र.रू.शाह
स्त्रोत :मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/12/2023
लोकसहभागाने परिपूर्ण जलसंधारणाचा "मेडसिंगा पॅटर्न'...
उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या...