गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर-पूर्व दिशेला वसलेला आहे. हा जिल्हा १८.४३' ते २१.५०' उत्तर अक्षांश आणि ७९.४५' ते ८०.५३' पूर्व रेखांश या दरम्यान मोडतो. यामुळे या जिल्ह्याचा भाग डेक्कन प्लेट्यू क्षेत्रात येतो. गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व सीमेला दुर्ग, राजनांदगाव हे छत्तीसगड राज्यातील जिल्हे, पश्चिमेला चंद्रपूर जिल्हा, उत्तरेस भंडारा जिल्हा व दक्षिणेस अंध्राप्रदेश मधील अदिलाबाद, करीमनगर जिल्हे व छत्तीसगड मधील जगदलपूर जिल्हा आहेत.
जिल्ह्याचे मुख्यालय गडचिरोली येथे वसलेले असून हा जिल्हा नागपूरपासून १८० कि.मी. एवढया अंतरावर आहे. गडचिरोली जिल्हा चंद्रपूर पासून ८० कि.मी. अंतरावर आहे. सदर जिल्हा वैनगंगा, गोदावरी व इंद्रावती या मोठ्या नद्यांनी अनुक्रमे पश्चिम, दक्षिण व पूर्व दिशेने वेढलेला आहे.
गडचिरोली जिल्हा एका दृष्टीक्षेपात |
जिल्हा मुख्यालय | गडचिरोली |
जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र | १४४१२ चौ.की.मी. |
जिल्ह्याचे भौगोलिक ठिकाण | १८.४३ ते २१.५० उत्तर अक्षांश |
७९.४५ ते ८०.५३ पूर्व रेखांश | |
समुद्रसपाटी पासून उंची - २१७ मी.(७१५ फिट ) | |
जिल्ह्याचे तापमान (१९९८)) | सर्वात कमी ११.३ डी.से. सर्वात जास्त ४७.७ डी.से. |
सरासरी पर्जन्यमान (२०११) | ८४०.७ मीली मी. |
जिल्ह्यातील एकूण उपविभाग (६) | १.गडचिरोली २. देसाईगंज (वडसा) ३. अहेरी ४. कुरखेडा ५. चामोर्शी ६. एटापल्ली |
जिल्ह्यातील एकूण तालुके | १२ |
जिल्ह्यातील एकूण गावे | १६७९ |
जिल्ह्यातील एकूण शहरे | २ ( गडचिरोली, देसाईगंज) |
जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायती | ४६७ |
एकूण नगरपालिका (२) | १. गडचिरोली २. देसाईगंज |
लोकसभा निर्वाचन क्षेत्र (१) | चिमूर-गडचिरोली |
विधानसभा निर्वांचन क्षेत्र (३) | गडचिरोली, आरमोरी, अहेरी |
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत : गडचिरोली जिल्हाअंतिम सुधारित : 5/27/2020