अनाथ, दुर्लक्षित, अपंग, बेवारशी अगर बहिष्कृत मुलांना व महिलांना आश्रय देणाऱ्या संस्था. मूलत: दारिद्र्य, अपघात, फसवणूक, घटस्फोट, मुलांना व स्त्रियांना टाकून देणे, कुमारी अवस्थेत अगर वैधव्यात मातृत्व येणे वा युद्ध इ. कारणांनी अनाथ व निराश्रितांची संख्या वाढते. त्यांचे उद्ध्वस्त जीवन वसविण्याचा प्रयत्न करणे समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक होऊन बसते.
लहान वयातच जगण्यातील भीषणता अनुभवलेल्या मुला-मुलींचं मानसिक स्वास्थ्य आणि जेजे ऍक्ट याविषयी चर्चा करणारा हा महत्त्वाचा लेख.
बुलडाणा हे ताराबाई शिंदे यांचं गाव. ताराबाईंचा ‘स्त्री-पुरुष तुलना’ हा निबंध आजही स्त्री-पुरुष भेदभाव जिथे जिथे होतो त्या प्रत्येक ठिकाणी डोळ्यात अंजन घालणारा आहे.
‘ग्रहणांकित चांदणं’ या २०१३ च्या दिवाळी अंकातील चर्चा, अनुभवकथन आपण वाचलं आहेच. याच नावाच्या या सदरात अपंग व्यक्तींच्या समस्यांवर सातत्याने चर्चा व्हावी
हायड्रोसेफेलेस या आजारामुळे बुद्धीच्या स्तरावर परिणाम झालेल्या एका छोट्या मुलीचा ‘निसर्गस्पर्श’ झाल्यानंतरचा एक हृद्य अनुभव
भारतात एकूण लोकसंख्येच्या ५० टक्के स्त्रिया आहेत आणि या निम्म्या लोकसंख्येला आजही शिक्षण आरोग्य, नोकरी या सर्वच क्षेत्रामध्ये मागे ठेवले जाते.
स्त्री ही आई, बहीण, पत्नीची भूमिका पार पाडत कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे पेलत असते. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रिया पुरुषांवर अवलंबून असल्याने त्यांना स्वतःचा निर्णय घेण्याचा फारसा अधिकार नाही.
लोकशाही प्रक्रियेमध्ये आपले मत अमूल्य आहे. त्यासाठी महिलांनी आपली जबाबदारी ओळखून मतदार यादीत नाव नोंदणी करणे गरजेची आहे.
परत एक बलात्कार न परत तीच व्यथा. सहा वर्षाची चिमुरडी ती, चोकलेट, बाहुल्या न मनसोक्त खेळणं इतकच काय तिचं जग असेल पण तिला काय ठाऊक असणार कि खरं जग तिच्या इतकं निष्पाप नाही.
‘वंचित विकास’ संस्थेच्या माध्यमातून लातूर येथे परित्यक्ता स्त्रियांकरता ‘सबला महिला केंद्र’ नावाने एक केंद्र चालवललं जातं. स्त्रियांना सन्मानाने जगता यावं या ध्यासाने कार्यरत असलेल्या या संस्थेच्या कार्याविषयीचा हा लेख.
बालविवाह ही आपल्या समाजात प्रचलित असलेल्या अनेक अनिष्ट प्रथांपैकी एक आहे.