অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्यथा आपलीच

व्यथा आपलीच

परत एक बलात्कार न परत तीच व्यथा. सहा वर्षाची चिमुरडी ती, चोकलेट, बाहुल्या न मनसोक्त खेळणं इतकच काय तिचं जग असेल पण तिला काय ठाऊक असणार कि खरं जग तिच्या इतकं निष्पाप नाही. काय वाटल असेल त्या निष्पाप मुलीला त्या असह्य वेदनेतून जाताना, त्या हैवानाचा छळ सोसताना. ज्या क्रूरतेची एक स्त्री कल्पना हि करू शकत नाही ते सोसलय त्या चिमुकल्या जीवाने. गुन्हेगार पकडला तर गेला, पण त्याचा अगदी जीव गेला ना तरी त्या मुलीच्या मोकळे पणाला अन विश्वासाला गेलेला तडा कशानेच भरल्या जाऊ शकत नाही. पण आता पुढे काय? गुन्हेगाराला शिक्षा होईल अन मुलीला न्याय मिळाला  असे जाहीर होऊन प्रकरण निवळेल. पण काय इतकं पुरेसा आहे ? मानवी विकृती विरुद्ध हा लढा काय फक्त तिच्याच आई वडिलांचा होता, कि कुठेतरी आपण सगळेच झुंजतोय फरक फक्त इतकाच कि त्यात ती चिमुकली होरपळली अन आपण नाही.

विकृती अशीच पनपत नाही तो कळस असतो स्वैराचाराचा; अन हा स्वैराचार स्वातंत्र्यातूनच जन्म घेत असतो. असले हैवान जन्म घेत नाहीत तर त्यांच्या स्वैराचारचा कळस त्यांना आंधळ करतो अन त्यात साथ देत असतो आपण. अगदी उदाहरण म्हणजे परंपरेने चालत आलेली मुला मुलीन्साठीची वेगवेगळी शिकवण. आज किती पालक असे आहेत ज्यांनी आपल्या मुलासाठी आणि मुलीसाठी घरात एकच नियम ठेवलाय? आजही कित्येक घरी 'मुलगा' म्हणून त्याने रात्रभर मित्राकडे राहिला तरी चालतो पण मुलीने मात्र सात च्या आत घरी याव हि काळ्या दगडावरची रेघ आहे. का मुलीने जितकं संस्कारी असणं गरजेचं आहे, तितकच मुलाने असणे महत्वाचे नाही? लहानपणा पासून  ज्याप्रमाणे मुलीला माणसाचा अहम जपण्याची शिकवण दिली जात असते तशीच शिकवण स्त्री चा मान जपण्याची, तिला स्वातंत्र्य देण्याची अन तीही तुझ्यासारखीच आहे हे सांगण्याची साधी शिकवण का मुलांना दिल्या जात नाही?

का सारखं सारख प्रत्येक एका बलात्कार नंतर स्त्री ला आम्हाला सन्मान द्या, मान द्या म्हणून ओरडावं लागतंय? असले काही प्रकार झाले कि लागलीच स्त्री सशक्तिकरणासाठी वेगवेगळे काय ते कॅम्पेन करतात, पण सध्या तरी स्त्रीयांना त्याची गरज नाही. स्त्रिया स्वबळावर जगण केव्हाच शिकल्या अन त्यांचे हक्क हि त्यांना कळालेले आहेत. मुळात आता गरज पालटली आहे;या समाजाला गरज आहे पुरुषांच्या मानसिक सशक्तिकरणाची. एका निरोगी नजरेची न खूप नाही पण एक माणूस म्हणून स्त्रीला बघण्याची ……

आणि ह्या प्रक्रियेत आजच्या स्त्रियाच महत्वाचा भाग निभावतील, कारण आपला मान आपणच जपायचा असतो. यात सगळ्यात पहिले एका स्त्रीने एका स्त्री ला जन्म घेऊ द्यावा लागेल. जे नियम मुलीसाठी आहेत तेच आणि सारखेच नियम मुलासाठी लागू करावे लागेल. वंशाचा दिवा किंवा एकुलता एक म्हणून त्यांस अतिस्वतात्र्या पासून दूर ठेवावे लागेल. अन सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही देवी समोर ती कुणीतरी देव आहे, किंवा तिला माणसापेक्षा जास्त शक्ती आहे म्हणून लेकराला हाथ जोडायला शिकवणं बंद कराव लागेल. मुळात ते दोन्ही .हातांनी जगातल्या अख्या स्त्री शक्तीला, एका आईला आणि तिच्या स्त्रीत्वाला नमन करायचे असते हे त्याला समजवावं लागेल. आणि सोबतच समस्त वडिलांना .आपल्या बायकांना मान देणं शिकावच लागेल, कारण तेच तुमच लेकरू अनुकरेल हे विसरू नका.  जर माय बापच नैतिकतेशी आणि मूल्यांशी तडजोड करणार असतील तर त्याच्या शिकवणीचा पाया कितपत मजबूत असेल हे त्यांचे त्यांनीच ठरवावे.

अक्खी तरुण मंडळी (मुलीही) मोडर्ण मोडर्ण म्हणून कज्युअल सेक्स, वन नाईट स्टेंड, लिव इन आणि पोर्न यासारख्या बाबींच्या विळख्यात स्वताला ढाळून घेताहेत. मुळात सेक्स जगाच्या पाठीवर सगळेच प्राणी त्यांच्या त्यांच्या तर्हेने करतात ते नैसर्गिक आहे पण जेव्हा त्यातल कुतूहल आणि प्रेम संपून जेव्हा त्यात गरज, नशा आणि रोमांच चा शिरकाव होतो ना तेव्हा हा हैवान जन्म घेत असतो.

मुलींनो, शरीर आणि स्वातंत्र्य सर्वस्व तुमचंच आहे, पण ते वापरायच का वापरू द्यायचं   हे तुम्ही ठरवणार आहात. कारण शेवटी समाज सुधारणेची टाळी एका हाताने वाजत नाही. सन्मान हवा असेल तर स्वताला तसे जपा आणि पायरी ढळू देऊ नका.

काय विडंबना म्हणावी ज्या पुराणांच्या आणी संस्कृतीच्या भरवश्यावर आपण परंपरेचे पायवे बांधलेत, त्या संस्कृतीत एका वेश्येला हि मान  आहे. कारण तिच्या शिवाय कुठल्याच देवीची मूर्ती पूर्ण होत नाही. म्हणूनच या देशाच्या संस्कृतीचे मुळे उघड्यावर पडू देऊ नका, सन्मान जपा, आणि हो सन्मानाच्या लढ्यासाठी नक्की समोर.या...................................

 

 

अंतिम सुधारित : 2/13/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate