मासेओ
मासेओ : ब्राझीलमधील आलागोअस राज्याची राजधानी. लोकसंख्या ३,७५,७७१ (१९८०). हे रेसीफेच्या नैर्ऋत्येस २०९ किमी. अटलांटिक महासागर व नॉर्ती खारकच्छ यांमधील चिंचोळ्या भागावर वसलेले आहे. राज्यातील प्रमुख व्यापारी व दळणवळण केंद्र म्हणून हे प्रसिद्ध आहे. येथे दोन विमानतळ आहेत.