आजकाल आर्थिक स्थिती चांगली असणारया मॉडर्न घरात इतर सर्व प्रकारच्या अद्ययावत उपकारणबरोबरच शोभिवंत माशाच्या मत्स्यालायाचे काचेचे घर ( फिश पॉट ) हे असतेच. त्यामुळे शोभिवंत माशांच्या पालनाला अलीकडे चांगले दिवस येऊ पाहताहेत. शोभिवंत माशाचे प्रजनन, पालन आणि विक्री हा व्यवसाय जम धरू लागला आहे.
सायप्रीनीड कुटुंबातील बार्ब आणि लोचेस जातीचे मासे प्रामुख्याने शोभिवंत मत्स्यपालनाकरता उपयोगात आणले जातात. याचबरोबर खाऱ्या पाण्यातील शोभिवंत मत्स्यपालन करताना मुलभूत बाबींची माहिती असणे फार महत्वाचे आहे.
१) काचेच्या मात्स्यालायाचा आकार ५० x३० x३० सें.मी अगर ६०x४५x३० सें. मी एवढा असावा.
२) मात्स्यालायाकरिता पावसाचे पाणी,वितळलेल्या बर्फाचे पाणी, डीस्टील वाटर वापरावे.
३) मात्सालायातील पाण्याचे तापमान २० ते ३० सें. एवढे असावे.
४) पाण्याची पारदर्शकता, पुरेसा प्रकाश, माशांची योग्य संख्या आणि पाणवनस्पती यांच्या वापरामुळे जे शेवाळ बनते ते कमी करण्यासाठी पाणी बदलावे लागते.
५) पाण्यात आलेले ढगाळपण घालवण्यासाठी ३ ते ४ शिंपले ठेवावेत.
६) मात्स्यालायला घरात ८-१० तास प्रकाश आणि ३-४ तास सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवावे. अगर प्रकाशासाठी ट्युबलाईट बसवावी.
७) खाडीयुक्त वाळू वापरावी. हि खडीवजा वाळू चांगल्या प्रकारे धुऊन वापरावी.
८) पाणवनस्पती ठेवावी. त्यामुळे मासे शोभिवंत दिसतात. प्राणवायूचे प्रमाण वाढते. पानवनस्पती अॅमेझॉन स्वोर्ड प्लान्ट, इंडिअन फर्न, बनाना प्लान्ट, वाटरलिली, हायद्रीला. इ. रकर आहेत ते वापरावे.
९) बुडबुडे सोडण्यासाठी एअर रेटर मशीनचा मत्स्यालयात वापर करावा.
१०) साधारणत: पाण्याच्या निम्मी घनमीटर हवा मत्स्यालयात असावी. याशिवाय मत्स्यालयात पाणी शुद्धीकरणासाठी फिल्टर बसवावा.
११) थंडीच्या दिवसात मात्स्यालायाचे तापमान नियंत्रित करण्यासाठी हिटर बसवावे.
१२) मासा जेवढा भुकेला राहतो तेवढा तो चांगला राहतो.थंडीत आठवड्यातन २-३ वेळा खाद्य द्यावे. खाद्याशिवाय डफ निया, मोईना, वर्म्स इत्यादी जिवंत खाद्यही द्याव.हे खाद्य पाण्यावर पसरून द्यावे.
१३) महत्वाचे म्हणजे मत्स्यालयात गप्पी,गोराफिश, गोल्डफिश,एंजल, टेट्रा,कोई, प्लटी,इ. शोभिवंत मासे पाळावेत. त्यांच्या बाबतीतली सर्वतोपरी माहिती आणि सवयी माहित करून त्यांचे पालन करावे.
हा व्यवसाय म्हणून करताना त्यांचे प्रजनन, मात्यालय आणि त्यांचे पालनपोषण इ. ची माहिती आणि प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय सुरु केल्यास निश्चितपणे चांगले अर्थार्जन करता येईल.
स्त्रोत - कृषी प्रवचने, प्रल्हाद यादव
अंतिम सुधारित : 6/5/2020
मासेमारी हा भारतातील पारंपरिक व्यवसाय. या व्यवसाया...
शोभेचे/अलंकारिक मासे पाळणे हा अनेकांचा छंद आहे. हा...
योग्य सुव्यवस्थापन केल्यास ८ महिन्यांचा मरळ संवर्ध...
जागतिक बाजारपेठेतील शोभिवंत माशांची मागणी लक्षात घ...