मत्स्यसंवर्धन गावतळी, लहान - मोठे नैसर्गिक तलाव, कृत्रिम पाझर तलाव व जलाशयात चांगल्या पद्धतीने करता येते. मत्स्यशेतीसाठी बारमाही पाण्याची सोय असणे गरजेचे आहे. तलावासाठी जमिनीची निवड करताना हलकी, उताराची जमीन असल्यास नैसर्गिकरीत्या पाणी बाहेर काढून टाकता येते. सपाट जमीन असेल तर मत्स्यतळे बांधताना तळाच्या बुडाला उतार द्यावा. तळ्याचा विस्तार 0.1 हेक्टर ते एक हेक्टर असावा. पाण्याची खोली दोन ते अडीच मीटर ठेवल्यास जास्तीत जास्त मत्स्यपालन करता येते.
सुरवातीला 0.1 हेक्टर जलक्षेत्र तयार करून मत्स्यपालन सुरू करावे. संवर्धनासाठी मोठ्या आकाराच्या, सोपी प्रजनन पद्धती असणाऱ्या व पाण्यातील परिवर्तनास तोंड देऊन प्रमाणित वनस्पतिजन्य नैसर्गिक व कृत्रिम खाद्यावर जलद वाढणाऱ्या निरोगी माशांच्या जातींची निवड फायदेशीर ठरते, तसेच पाण्यातील विविध थरांत उपलब्ध नैसर्गिक अन्नाचा पुरेपूर वापर करून कार्प जातीच्या माशांची एकत्रित किंवा मिश्रशेती करता येते.
भारतीय प्रमुख कार्प जातींमध्ये कटला, रोहू व मृगळ या जाती अनुक्रमे पृष्ठभागाजवळ, मध्यभागातील व तळामधील नैसर्गिक अन्नाचा वापर करून वाढणाऱ्या जाती आहेत. याबरोबर काही प्रमाणात गवत्या, चंदेरी, कॉमन कार्प वाढविल्यास या अन्नावर उपजीविका करून भारतीय प्रमुख कार्पबरोबर जास्तीत जास्त उत्पादन घेणे शक्य होते. या माशांना चांगली मागणी आहे.
- 022 - 27452775
खार जमीन संशोधन केंद्र,
बंदर रोड, पनवेल, जि. रायगड
- 0712 - 2567192
मत्स्य विज्ञान महाविद्यालय, नागपूर
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ज्या काचेच्या भांड्यात अथवा हौदात हौसेखातर, प्रदर्...
डोके मोठे व रुंद असते. शरीराचा मध्य भाग चांगलाच रु...
मोटार लाँचेसचा मासेमारी आणि वाहतुकीसाठी प्रायोगिक ...
मत्स्यपालन हे गोड्या पाण्याच्या बरोबरीने खाजण जमिन...