অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मासेमार घूबड

मासेमार घूबड

मासेमार घूबड
घूबड म्हटले की आपल्याकडे लगेचच त्याला अशुभ पक्षी म्हणून सगळे त्याचा तिरस्कार करतात. त्याच्या निशाचर सवयी आणि काहीसे भयावह वाटणारे मोठे बटबटीत डोळे यामुळे हे पक्षी जरी भितीदायक वाटत असले तरी खरे तर ते आपल्या उंदरांची शिकार करत असल्यामुळे खुप फायद्याचे ठरतात. आपल्याकडे भारतात घूबडांच्या अनेक जाती आढळतात यातील काही अगदी गावात, शहरातसुद्धा दिसतात. तर काही जाती फक्त घनदाट जंगलातच आढळून येतात. अशीच एक दाट जंगलात आढळणारी जात आहे "ब्राऊन फिश आऊल"https://static.vikaspedia.in/media_vikaspedia/mr/images/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-92a91594d937940/copy_of_13.jpg"image-left" src="https://static.vikaspedia.in/media_vikaspedia/mr/images/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-92a91594d937940/copy_of_13.jpg" />ही जात घनदाट जंगलात जरी रहात असली तरी त्यांचे वास्तव्य पाण्याजवळच असते. यामुळे त्यांना त्यांचे खाणे पकडणे, खाणे सहज सुलभ जाते. यांचा विणीचा हंगाम उन्हाळ्याच्या गरम महिन्यात असतो कारण या काळात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांना त्यांच्या पिल्लांकरता अधिकाधिक खाणे लगेच पकडता येते. यांची घरटी झाडांच्या बेचक्यामधे, गरूडांनी सोडलेल्या घरट्यात अथवा क्वचीतप्रसंगी दगडांच्या कपारीत असतात. मादी सहसा २/३ अंडी घालते आणि ती एकटीच अंदाजे ३५ दिवस ही अंडी उबवते. इतर पक्ष्यांप्रमाणेच घूबडेसुद्धा त्यांचे भक्ष्य आख्खे गिळतात. पक्ष्यांना दात नसल्यामुळे ते त्यांचे भक्ष्य चावून खाऊ शकत नाहीत. मात्र त्यांच्या तिक्ष्ण आणि धारदार चोचीमुळे ते त्यांच्या भक्ष्याचे लहान लहान तुकडे करून तसेच गिळतात. घूबडे त्यांचे खाणे खाताना मऊ मांस कठीण अश्या हाडे, काटे, नख्या यापासून वेगळे करून आधी पचवतात. हे पिसे, हाडे, काटे, केस असे सहज न पचणारे पदार्थ ते उलटून टाकतात. या त्यांच्या उलटलेल्या गोळ्यावरून घूबडांचे मुख्य अन्न आणि त्यांच्या सवयी यांचा अधिक अभ्यास तज्ञांना करता येतो.

बांधवगढ हे जंगल या घूबडांच्या दिसण्यासाठी प्रसिद्ध आहे. आतापर्यंत अनेक वर्षे या घूबडाची खुपसारी छायाचित्रे या जंगालात मी घेतली आहेत. या वर्षी उन्हाळ्यात प्रथमच ह्या घूबडाचे घरटे मला सापडले. खालून झाडाच्या बेचक्यात डोकावणारी दोन पिल्ले सहज दिसायची. समोरच्याच झाडावरच्या फांदीवर नर आणि मादी बसलेले म्हणण्यापेक्षा झोपलेले असायचे. बहुदा रात्रभर या खादाड पिल्लांकरता अन्न पकडून आणून आणून त्यांना भरवताना ते बिचारे दमत असावेत. एकदा मात्र त्या घूबडाने डोळे किलकिले केले, एक मोठी जांभई दिली. यानंतर त्याने रात्रभर न पचलेल्या अन्नाचा एक मोठा गोळा उलटून टाकला. इतका वेळ त्याचे डोळे बंदच होते, मधे मधे तो एक डोळा उघडून बघायचा. यानंतर त्याने पंखांची अशी काही उघडमीट करून आळोखेपिळोखे दिले की सांगता सोय नाही. जवळपास अर्धा तास मी त्या झाडाखाली नसून शांतपणे त्यांच्या हालचाली न्याहाळत होतो. अर्थातच हे न्याहाळत असताना कॅमेरा तयार असल्यामुळे त्याच्या या विविध अवस्था मला सहज टिपता आल्या.

लेखक - युवराज गुर्जर

स्त्रोत - युवराज गुर्जर ब्लॉग

http://wingedbeautiesofindia.blogspot.in/search?updated-min=2009-01-01T00:00:00%2B05:30&updated-max=2010-01-01T00:00:00%2B05:30&max-results=11

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate