मासेमारी हा भारतातील पारंपरिक व्यवसाय. या व्यवसायाचेदेखील आता आधुनिकीकरण होत आहे. मत्स्यशेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासाठी कोची येथे केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन संस्था कार्यरत आहे. यानठिकाणी सागरी माशांवर संशोधन, शिक्षण आणि तंत्रज्ञान प्रसारावर भर देण्यात आला आहे. या संस्थेने भारतीय किनारपट्टीच्या प्रदेशात आढळणाऱ्या 200 माशांच्या जातींची नोंद केली आहे.
विविध भागांत आढळणाऱ्या मत्स्य जातींचे संवर्धनही संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. विविध राज्यांमध्ये मत्स्य उत्पादन वाढीसाठी मच्छीमारांच्या सोबत विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. राज्य सरकारच्या मदतीने मच्छीमारांसाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते.
जगभरातील मत्स्य संशोधन संस्थांच्या सहकार्यातून मत्स्यशेतीमधील नवीन संशोधनाची देवाण-घेवाण करण्यात येत आहे. त्याचा फायदा भारतातील मत्स्य उत्पादकांना होत आहे. संस्थेने संकेतस्थळाच्या माध्यमातून संस्थेत झालेले संशोधन, तसेच विदेशातील संशोधन संस्थांनी केलेले संशोधन उपलब्ध करून दिले आहे. हवामान बदलाचा परिणाम मत्स्य उत्पादनावर होत आहे. याच्या अभ्यासासाठी संस्थेने विशेष संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे. सुदूर संवेदन तंत्राच्या मदतीने समुद्रामध्ये असलेला मत्स्यसाठा शोधण्यात येत आहे. त्याचा फायदा मच्छीमारांना झाला आहे. माशांच्यामधील जैव विविधतेचे संरक्षण आणि संवर्धन होण्यासाठी मत्स्य बॅंक विकसित करण्यात येत आहे.
संकेत स्थळ - www.cmfri.org.इन
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
मासा हा एक आहारातील प्रमुख घटक आहे. माशांच्या प्र...
योग्य सुव्यवस्थापन केल्यास ८ महिन्यांचा मरळ संवर्ध...
माशांच्या अंडी उबवणीनंतर पहिल्या काही अवस्थेतील मा...
उद्देश व स्वरुप : आदिवासी क्षेत्रात मोठे व मध्यम ...