तापसह माती
तापसह माती : (फायर क्ले). मुख्यतः सिलिका (SiO2) व अॅल्युमिना (Al2O3) यांनी बनलेल्या आणि दीर्घकाल उच्च तापमान सहन करू शकणाऱ्या मृत्तिकेला तापसह माती म्हणतात. विशेषकरून ब्रिटिश भूवैज्ञानिक ही संज्ञा वापरतात. सिलिका व अॅल्युमिना यांच्याशिवाय हिच्यात फेरिक ऑक्साइड (Fe2O3), लाइम (CaO), मॅग्नेशियम ऑक्साइड (MgO) व अल्कली (Na2O,K2O) हीही अल्प प्रमाणात असतात.