अन्नामध्ये काही काही वेळा जंतूंमुळे विष तयार होते, तर काही वेळा अन्नभेसळीमुळे विषारी पदार्थ मिसळले जातात.
आतडेदाह हा मोठया आतडयाचा एक चिवट आजार आहे.
आम्लता ही नेहमी आढळणारी तक्रार आहे. ब-याच माणसांना कधी ना कधी याचा अनुभव येतोच.
उचकी म्हणजे श्वासपटलाची वारंवार होणारी प्रतिक्षिप्त क्रिया.
पचनसंस्थेत जठरामधील क्रिया मंदावली किंवा जठराच्या आतल्या आवरणाचा दाह झाला तर त्यातले अन्न बाहेर टाकण्याची क्रिया होते.
काही जणांना गुदद्वाराच्या तोंडाशी एक जखम होते. नेहमी कुंथावे लागल्यामुळे किंवा मळाला खडे झाल्यामुळे बहुधा ही जखम होते.
ब-याच लोकांना सारख्या ढेकरा येणे किंवा वारा सरणे याचा त्रास होत असतो. उतारवयात हे जास्त आढळते.
जंत होणे ही आपल्या देशातली महत्त्वाची समस्या आहे. ग्रामीण भागात तर80-90 टक्के मुलांच्या पोटात जंत असतात.
मनुष्य निरोगी असताना मळाचा घट्टपणा ठरावीक असतो. तसेच मलविसर्जन दिवसातून बहुधा एकाच वेळेस होते. मात्र काही आजारांत मळाचा पातळपणा वाढतो.
लहानथोरांच्या सर्व प्रकारच्या आजारांमध्ये पचनसंस्थेच्या आजारांचे प्रमाण सर्वात जास्त आहे.
पचनसंस्थेची तपासणी म्हणजे तोंडापासून गुदद्वारापर्यंतची तपासणी. पचनसंस्था, यकृत, पांथरी यांचे चित्र पाहिल्यावर पोटाच्या आत कोठेकोठे काय असते याची कल्पना येते.
रोज पोट पूर्ण साफ होणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे.
मूळव्याध (मोड किंवा पाईल्स) म्हणजे गुदद्वाराच्या तोंडाशी असलेल्या नीलांना सूज येऊन रक्त साठून राहणे.