काही जणांना गुदद्वाराच्या तोंडाशी एक जखम होते. नेहमी कुंथावे लागल्यामुळे किंवा मळाला खडे झाल्यामुळे बहुधा ही जखम होते. दिसायला अगदी लहान असलेली ही जखम खूपच दुखणारी असते. मोड (मूळव्याध) व ही गुदद्वार जखम ब-याच वेळा एकत्र आढळतात.
प्रथम कुंथण्याचे कारण म्हणजे बध्दकोष्ठ बरे करणे महत्त्वाचे. या जखमेवर मूळव्याधीमलम लावून तात्पुरता आराम मिळू शकतो. पण (भूल देऊन) गुदद्वाराचे स्नायूवर्तुळ ढिले केल्यावरच खरा आराम पडतो. यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते.
मूळव्याध व गुदद्वारव्रण दोन्हीमध्ये समान उपचार याप्रमाणे
1. मळ मऊ व सहज होण्यासाठी लिक्वीड पॅराफिनसारख्या रेचकाचा उपयोग त्रास पूर्ण बरा होईपर्यंत करणे.
2. गरम पाणी (आंघोळीला वापरतो तेवढे गरम) एका टबमध्ये घेऊन त्यात बसून शेक घेणे. याऐवजी घमेली किंवा परात चालेल
3. गुदद्वाराची वेदना कमी करणारे मलम झायलोकेन जेली ही मलविसर्जनाचे आधी व नंतरही लावावे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 5/2/2020
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
महिलांमध्ये त्वचेवर गांधी उठण्याची तक्रार मोठ्या प...