डोळयात काही विकार नसताना आणि नंबर चष्मा देऊन दुरूस्त केला तरी डोळयाची नजर कमी होणे म्हणजेच 'आळशी डोळा'.
काचबिंदू म्हणजे डोळयातला (नेत्रगोलातला) दाब वाढणे.
आरोग्यो व कुटुंब कल्यारण विभागाने २००६-०७ मध्येे केलेल्यां सर्वेक्क्षणानुसार भारतामध्ये् टाळता येण्यायजोग्यार अंधत्वानचे प्रमाण १ टकके म्हयणजेच १२१ लक्ष.
खुप-या हा रोग एक प्रकारच्या जंतूंमुळे होतो. हा एक दीर्घकालीन आजार आहे.
डोळयाच्या आरोग्यासाठी 'अ' जीवनसत्त्वाचा पुरवठा होणे आवश्यक आहे.
पापणी उघडल्यावर डोळयाचा जेवढा भाग दिसतो त्यापेक्षा बराच जास्त भाग आत असतो.
डोळयाच्या सर्व जखमांवर, विशेषत:बुबुळाच्या जखमांवर ताबडतोब नेत्रतज्ज्ञाकडून उपचार होणे आवश्यक आहे.
डोळयामध्ये कचरा, धातूचे कण, कीटक, इत्यादी जाणे ही वारंवार आढळणारी तक्रार आहे.
डोळे येणे (कंजक्टीव्हायटीस) या स्थितीमधे डोळ्याचा पांढरा भाग झाकणा-या पडद्याला (कंजक्टीव्हा) दाह होतो, तो लाल होतो आणि खुपू लागतो.
डोळे येणे म्हणजे अचानक डोळयांची जळजळ, दुखणे, पाणी व घाण येणे, पापण्या चिकटणे व प्रकाश सहन न होणे.
डोळ्यांची निगा कशी राखावी याची माहिती यामध्ये दिली आहे.
डोळा हा प्रकाशाचा आणि ज्ञानाचा रस्ता आहे. मानवी विकासात डोळयाचे अपरंपार महत्त्व आहे.
दोन्ही डोळे समांतर कक्षात न राहण्याच्या दोषास 'तिरळेपणा' म्हणतात.
दृष्टीदोष असेल तर नेत्रतज्ज्ञ विशिष्ट तक्ते वापरून व यंत्राने तपासणी करतात.
दृष्टीदोष म्हणजे कमी दिसणे म्हणजेच सामान्य भाषेत डोळयाला नंबर लागणे. यात जवळचे किंवा लांबचे अंधुक दिसते.
सन २०११ च्यात जनगणनेनुसार भारताची लोकसंख्येुच्याळ ( १२१ कोटी) १ टक्के अंधत्व ( द्ष्टीे ६/६० व त्याचपेक्षा कमी) म्ह णजेच १ कोटी २१ लक्ष अंध व्याक्ति आहेत.
फूल पडून बुबुळ निकामी झाले तर त्यावर खरा एकच उपाय म्हणजे निरोगी बुबुळ बसवणे.
नेत्रपटल हे संवेदनाक्षम पेशींनी बनलेले असते. प्रकाश आणि प्रतिमा, संवेदना या पेशींमधून नेत्रचेता मार्फत (डोळयाची नस) सरळ मेंदूकडे पोचतात.
हा त्रास बहुधा लहान मुलांना होतो. याचा संसर्ग मुलांना एकमेकांत होतो.
बुबुळाचा दाह होऊन जखमझाल्यामुळे कायमचा दृष्टीदोष येऊ शकतो.
भारतात मोतीबिंदू, दृष्टीदोष आणि बुबुळाला फूल पडणे ह्या प्रमुख समस्या आहेत.
पापण्यांच्या केसांच्या मुळाशी गाठ, किंवा पू येऊन पापणी सुजण्याला आपण रांजणवाडी म्हणतो.
रातांधळेपणा : अंधुक अथवा मंद प्रकाशात कमी दिसणे किंवा काहीही न दिसणे या विकृतीला ‘रातांधळेपणा’ म्हणतात.दिवसा उत्तम दिसणे परंतु रात्रीच्या वेळी कमी दिसणे यावरून रातांधळेपणा (रात्र-रात) ही संज्ञा बनली आहे.
डोळयांच्या नाकाकडच्या कोप-यांत दोन्ही पापण्यांच्या टोकांशी एकेक छिद्र असते. त्यातून हे अश्रू एका नलिकेमार्फत नाकात उतरतात.
यात डोळयाच्या बुबुळावर नेत्र अस्तराचा पडदा वाढतो. तो हळूहळू बुबुळावर येतो.