डोळयाच्या आरोग्यासाठी 'अ' जीवनसत्त्वाचा पुरवठा होणे आवश्यक आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये या जीवनसत्त्वाच्या अभावाचा परिणाम तीव्र असतो. हिरव्या पालेभाज्या, पिवळी व लाल फळे (आंबे, पपई, गाजर), शेवगा, मांसाहारातील यकृत, इत्यादींमध्ये जीवनसत्त्व 'अ' भरपूर प्रमाणावर असते. 'अ' जीवनसत्त्वाच्या अभावाने आधी रातांधळेपणा येतो. यामुळे रात्री जेवताना हात ताटात चाचपडत राहतो. यापुढे श्वेतपटलावर पांढरे ठिपके (बिटॉट स्पॉट), बुबुळ व नेत्रअस्तराचा कोरडेपणा, बुबुळाचा धुरकटपणा, बुबुळावर जखमा व मग फूल पडणे, नेत्रपटलाची हानी होणे, इत्यादी बदल होतात. रातांधळेपणाच्या अवस्थेतच 'अ'जीवनसत्त्वाचा डोस दिला पाहिजे (दोन लाख युनिट).आरोग्य केंद्रातर्फे मुलांना असा प्रतिबंधक डोस दर सहा महिन्यांनी दिला जातो. यामुळे हा आजार आता पुष्कळ कमी झाला आहे. आपली रोगप्रतिकारशक्तीही 'अ' जीवनसत्वामुळे टिकून राहते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...
अ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होणारे आजार हल्ली कमी ...
आपल्या शरीराला कोणते जीवनसत्व आवश्यक असतात आणि त...
हेल्थ फोन निर्मित जीवनसत्व अ चित्रफित